मुंबई वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला असून संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेमधील युती तुटणार असल्याची माहिती समोर आली आहे. संभाजी ब्रिगेड राज्यात ५० पेक्षा जास्त उमेदवार जाहीर करणार आहे.
शिवसेना ठाकरे गटासोबत अडीच वर्षे असणारी युती संभाजी ब्रिगेड तुटणार आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संभाजी ब्रिगेडसाठी असणाऱ्या जागांवरती उमेदवार दिला जात नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेड नाराज असून त्यांनी आता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी ब्रिगेड शिवसेनेसोबत असणारी अडीच वर्षांची युती तोडणार आहे. लवकरच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे भूमिका जाहीर करणार आहेत.
संभाजी ब्रिगेडच्या एका शिष्टमंडळाने मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेड मनोज जरांगे यांच्याबरोबर जाणार आहेत. दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे.