ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिवसेनेचे ट्वीट : काकांची पुंगी निघाली, नागोबा डुलाया लागला !

मुंबई : वृत्तसंस्था

शिवसेनेत आता दोन गट झाले आहेत. व्यंगचित्राचा वारसा शिंदे सेनेने सुद्धा चालवला आहे. अश्यात एका व्यंगचित्राने सध्या राज्याचे लक्ष वेधले आहे. ठाकरे गटासह या नेत्यावर टीका करण्यात आली आहे. कधीकाळी मार्मिकची राज्यातील राजकारण्यांना कोण भीती वाटत होती. शिवसेनेच्या डरकाळी फोडणाऱ्या वाघाच्या शब्द फटकाऱ्यानेच नाही तर व्यंगचित्रांने अनेकांची फजिती होत असे. अगदी मार्मिक टीका करण्यात व्यंगचित्राचे माध्यम प्रभावी होते. ते आजही प्रभावीपणे वापरल्या जात आहे. व्यंगचित्रे ही एकप्रकारे शिवसेनेची परंपराच आहे.

राज्यात उजवे आणि काँग्रेस असा परंपरागत वाद गेल्या काही वर्षांपासून सुरु होता. शिवसेना-भाजप विरुद्ध काँग्रेस आणि मित्र पक्ष असा सामना होता. पण गेल्या काही वर्षात राज्यातील राजकारणाने मोठी कूस बदलली. 2019 नंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. तर दोन वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणाने मोठी कूस बदलली. शिवसेनेची दोन शक्कल झाली. शिंदे गटाने भाजपसोबत सोयरीक केली. तर पुढे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली. अजित दादा महायुतीत दाखल झाले.
महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत. अशात तर त्यांच्या भाषेला पण चांगलीच धार चढल्याचे दिसते. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात जोरदार शा‍ब्दिक हल्ले सुरु आहेत. तर राष्ट्रवादीच्या दोन गटात सुद्धा अनेकदा वाकयुद्ध रंगले. उद्धव ठाकरे हे भाजपवर पण तिखट हल्ले करत आहेत. भाजपने सुद्धा त्यांच्यावर प्रहार केला आहे. लोकसभेत महाविकास आघाडीने मोठी आघाडी घेतली. तर आता विधानसभेत सुद्धा महायुतीला पळता भूई थोडी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर महायुतीने सुद्धा विधानसभेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.

शिवसेनेच्या ट्वीटर हँडलवरुन हे ट्वीट करण्यात आले आहे. त्यात ज्येष्ठ नेते शरद पवार हे पुंगी वाजवताना दिसत आहे. तर त्यांच्या तालावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे डोलत असल्याचे चित्र रंगवण्यात आले आहे. बारकाईने पाहिले तर या चित्रात मशाल हे उद्धव ठाकरे यांचे चिन्हं विझल्याचे आणि त्यातून आता केवळ धूर येत असल्याचा मार्मिक चिमटा काढण्यात आला आहे. शरद पवार यांच्या तालावर उद्धव ठाकरे गट नाचत असल्याची बोचरी टीका जणू या व्यंगचित्रातून करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!