अक्कलकोट, दि.३१ : अक्कलकोट येथील विश्व् अकॅडमी इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. ‘परिवर्तन’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात नैसर्गिक, शारीरिक, मानसिक, आत्मिक अशा स्तरांवरिल बदल हे नृत्य, माईम अॅक्ट्, नाटिका या स्वरुपात मुलांनी अतिशय सुंदर सादर केले. शिवपुरीचा यज्ञीय वारसा अत्यंत समर्पक रुपाने प्रत्येक सादरीकरणात दिसून आला. कार्यक्रमास पालकांसहित ऑस्ट्रियन आणि जर्मन अग्निहोत्रींनी सुध्दा उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.विविध फूड स्टॉल्स्, फोटो पॉईंट आणि प्रेक्षकांसाठी आयोजित केलेले विविध गेम्स् हे सुध्दा कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.याप्रसंगी संस्थाप्रमुख डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले,डॉ.गिरिजा राजीमवाले यांनी मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना डॉ. राजीमवाले यांनी विश्व अकॅडमीच्या शिक्षण पद्धती विषयी मार्गदर्शन करत पालकांनी मुलांकडे लक्ष देऊन चांगला नागरिक घडविण्यासाठी प्रयत्न करावा,असे आवाहन केले.डॉ.गिरीजा राजीमवाले यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलेचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.यावेळी गायत्री पारखे,प्राचार्य अनिष नायर, अभिजीत स्वामी,गिरीजा एकबोटे, अभय शेटे, लगशेट्टी, यांच्यासह पालक,विद्यार्थी,विश्व शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.