ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कॉंग्रेसला धक्का : सूरतनंतर इंदूरमध्ये भाजप उमेदवार बिनविरोध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशात लोकसभा निवडणूक जोर धरीत असतांना गेल्या काही दिवसापूर्वी गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघानंतर इंदूर लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला असतांना सूरतनंतर इंदूरमध्ये भाजप उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार अक्षय कांती बम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यानंतर काँग्रेस उमेदवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. कैलाश विजयवर्गीय यांच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

गुजरातनंतर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. इंदूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे अक्षय कांती बम यांनी अर्ज मागे घेतला आहे. बम यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपच्या मार्गावर भाजपचे वरिष्ठ नेते कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी याबाबत माहिती दिली.

विजयवर्गीय यांनी अक्षय बम यांच्यासोबत सेल्फी शेअर केला. ‘इंदूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आणि प्रदेशाध्यक्ष वीडी शर्मा यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये स्वागत आहे, असं ट्विट करत विजयवर्गीय यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.

इंदूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत २५ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. २९ एप्रिल हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी भाजपने काँग्रसच्या उमेदवाराला गळाला यश लावण्यास यश मिळालं आहे. इंदूर लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी ही ४ जूनला संपन्न होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!