ध्यास विश्वसार्ह बातमीचा

श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्ती सोहळा अक्कलकोटमध्ये उत्साहात

महाआरती व महिला भक्तांची बाईक रॅली

अक्कलकोट :  तालुका प्रतिनिधी

अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून अक्कलकोट येथील श्रीराम मंदिरासह अक्कलकोटमधील विविध ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव समितीच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी स्टेशन रोडवरील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांची महाआरती श्री.स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे, माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, महेश हिंडोळे, प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम मंदिरात महाआरती संपन्न झाली.

तत्पूर्वी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ते श्रीराम मंदिर पर्यंत महिला भक्तांची बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. मोठ्या संख्येने या बाईक रॅलीमध्ये महिला मंडळींनी आपला सहभाग नोंदविला. सायंकाळी ७ वाजता फत्तेसिंह क्रीडांगणावर भव्य दिव्य दीपोत्सवाने दिपोत्सव साजरा करून अयोध्येतील श्रीरामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा वर्षपूर्ती सोहळा मोठ्या भक्ती भावात व मंगलमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी उपस्थित सर्व भाविकांना श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान कडून व श्रीराम भक्तांकडून शिरा व लाडू पदार्थांचे गोड प्रसाद वाटप करण्यात आले. हजारो भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला.

यावेळी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या सौजन्याने कै.कल्याणराव उर्फ बाळासाहेब इंगळे, कै.उमेश कल्याणराव इंगळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अक्कलकोट येथील श्रीराम जन्मोत्सव समितीस प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीची भेट प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी प्रितेश किलजे,संतोष वगाले, उषा हंचाटे, स्मीता कदम, श्रृती पाटील, सारीका वगाले, संदीप कटकधोंड, उदय नरेगल, संतोष पत्तरगे, अजय आडवितोटे, महेश वागदरे, ऋषिकेश लोणारी, राहूल वाडे, प्रसन्न गवंडी, सौरभ हळके, धनराज पाटील, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, प्रविण घाटगे, ज्ञानेश्वर भोसले, मदन राठोड, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, राज मद्रीकर, देविदास गवंडी, आबा पवार, महेश काटकर, अमर पाटील आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!