अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
येथील श्री स्वामी समर्थ प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सिद्धाराम अंबिगेर तर व्हाईस चेअरमनपदी महेश हंचाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गुरुवारी,नूतन संचालक मंडळाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी एस.व्ही.कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी या निवडी करण्यात आल्या. शिक्षक समितीचे नेते अनिल कादे यांच्या नेतृत्वाखाली आणि संस्थेचे प्रवर्तक दयानंद कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवड बिनविरोध करण्यात आली असून संचालक म्हणून श्रीशैल हडलगी,सिद्धाराम अंबिगेर,बसवराज गोरे,राजशेखर गोब्बूर,महेश हंचाटे,कल्याणी गंगोंडा,यल्लप्पा ईटेनवरू, श्रीकांत राठोड,लायप्पा सुडगाडे,संगय्या वस्त्रद,शोभा कलशेट्टी,कन्याकुमारी पडवळ आणि दयानंद चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. पतसंस्थेचे १६५ सभासद असून स्वभांडवलावर जवळपास ७५ लाख कर्जवाटप असून ९ टक्के व्याजदर हा इतर पतसंस्थेच्या तुलनेत सर्वात कमी आहे.यावेळी मावळते चेअरमन श्रीशैल हडलगी यांचा सत्कार संचालक मंडळाच्या वतीने संपन्न झाला.
यावेळी तज्ज्ञ संचालक म्हणून श्रीमंत पुजारी,माधव लहाने यांची निवड करण्यात आली.काटकसरीने कारभार करत सभासदांचे आर्थिक हित जोपासण्याबरोबरच आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी नूतन संचालक मंडळ कार्यरत असेल, अशी ग्वाही नूतन चेअरमन सिद्धाराम अंबिगेर यांनी दिली.यावेळी सभासद बांधव उपस्थित होते.