ध्यास विश्वसार्ह बातमीचा

श्री सिध्देश्वर यात्रा महोत्सवानिमित्त मद्य विक्री बंद

सोलापूर, वृत्तसंस्था 

 

श्री. सिध्देश्वर यात्रा महोत्सव सन 2025 निमित्त सोलापूर शहरात सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने ,महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम मधील कलम 142 अन्वये प्रदाने करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दि. 13, 14 व 15 रोजी सोलापूर शहरातील सर्व देशी व विदेशी, ताडी विक्री अनुज्ञप्तीचे व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 

संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी दि. 13 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत, दि. 14 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजलेनंतर व दि. 15 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजलेनंतर बंद ठेवावीत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यां विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही नमूद करण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!