ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सिद्धाराम – शंकर प्रतिष्ठानच्या उभारणीत नाविंदगी यांचे योगदान मोठे : प्रा.भुजबळ ;अक्कलकोट येथे प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रम

 

अक्कलकोट, दि.२ : अक्कलकोट येथील नावाजलेल्या सिद्धाराम – शंकर प्रतिष्ठानच्या उभारणीत संजय नाविंदगी यांचे योगदान मोठे होते.त्यांच्यामुळे आज संस्था नावारूपास आली,असे प्रतिपादन व्यवस्थापकीय प्रमुख प्रा.धनराज भुजबळ यांनी केले.

शुक्रवारी, अक्कलकोट येथील सिद्धाराम शंकर प्रतिष्ठान येथे माजी अध्यक्ष कै.संजय नाविंदगी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.प्रारंभी नाविंदगी यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर नाविंदगी यांचे बंधू शास्त्रज्ञ राजू नाविंदगी ,चंदन आडवीतोटे, मल्लिनाथ मसुती ,संतोष जीरोळे, अभय शेटे ,धरेश्वर नाविंदगी, युवराज अजनाळकर, निबंर्गी, व्यवस्थापकीय प्रमुख प्रा.धनराज भुजबळ,पर्यवेक्षक प्रा.शंकर सौदागरे ,दादासाहेब खराटे ,प्रा. राजीव कोरे , प्रा .अर्जुन मुळे, प्रा. गजानन शिवशरण ,प्रा. रोहित माडेकर ,महेश जगताप व इतर कर्मचारी वर्ग तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी राजू नाविंदगी यांनी मनोगत व्यक्त करताना कै. संजय नाविंदगी यांनी केलेल्या कामाचा आलेख वाचून दाखवला. यावेळी भुजबळ यांनी कै.संजय नाविंदगी यांचे फार मोठे योगदान सिद्धाराम शंकर प्रतिष्ठान उभारणीमध्ये असल्याचे मनोगत व्यक्त केले व गेली वर्षभर त्यांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली ती पोकळी कधीही न भरून निघणारी असल्याचे सांगितले व त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून बाहेर येण्यासाठी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करण्यात आले.कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दादासाहेब खराटे यांनी केले.आभार पर्यवेक्षक प्रा. शंकर सौदागरे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!