मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडी आतापासून कामाला लागले असून नुकतेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठे वक्तव्य केल्याने राज्यातील महाविकास आघाडीत नेमके काय चालते यावर चर्चा रंगू लागली आहे.
महाविकास आघाडीतील पक्ष श्रीमंत मराठ्यांचे आहेत. राज्यात गरीब आणि श्रीमंत मराठ्यांचे सुरू आहे. त्याच्यामध्ये ओबीसी आरक्षणाचा बळी दिला जात आहे. त्यामुळे मी त्या आघाडीतून बाहेर पडलो असे विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तसेच तुला बघून घेईन अशी भाषा आजपर्यंत कधीच पाहिली नाही असे म्हणत त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे. आंबेडकर यांची राज्यभर आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे. परभणीमध्ये ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीसोबत एकत्र येण्याची तयारी होती. मात्र त्यावेळी ते शक्य नाही झाले त्यानंतर आंबेडकरांनी स्वबळावर निवडणूक लढवली. मात्र लोकसभेत महाविकास आघाडीसोबत येण्याची तयारी ठेवणारे आंबेडकर आता मात्र सातत्याने टीका करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ते म्हणाले, ”श्रीमंत मराठ्यांनी महाविकास आघाडीतील पक्ष काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यामधील पुढाऱ्यांना विकत घेतले आहे. सत्ता त्यांनी स्वता:कडे कबीज केली आहे. ही तिन्ही पक्ष श्रीमंत मराठ्यांचे आहे. राज्यात सध्या जे भांडण सुरू आहे. ते गरीब आणि श्रीमंत मराठ्यांचे सुरू आहे. त्याच्यामध्ये ओबीसी आरक्षणाचा बळी दिला जात आहे. यामुळे आम्ही त्या आघाडीतून बाहेर पडलो”, असे वंचित बहुजन आघाडी नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.