मुंबई : वृत्तसंस्था
राज्यभर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका मांडत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील दौरा करत असून त्यांच्या या दौऱ्यावर विरोधकांकडून सडकून टीकाही होत आहे. मराठा समाजाच्या गरिबीच्या मुद्द्यावर आरक्षणाची मागणी केली जाते, मात्र दुसरीकडे जेबीसीने फुले टाकून स्वागत केले जात असल्याची टीका होत आहे. तसेच शेकडो एकरवर सभा घेतली जाते, यावर देखील आक्षेप घेतला जात आहे. त्याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमचा समाज एकमेकांवर प्रेम करतो. लोक माझ्यावर प्रेम करतात म्हणून ते फुले टाकत असल्याचे जरांगे म्हणाले. इतकेच नाही तर जालन्याच्या सभेत तर 148 जेसीबीवरुन फुले टाकण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला.
यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ‘गोरगरिब मराठा समाजाच्या लेकरांनी गेली 60-70 वर्षे आरक्षणाची वाट बघितली. इतकी वर्षे लढून मराठा समाजा आशा मावळल्या होत्या. मात्र, आता 32 लाख लोकांना आरक्षण मिळाले आहे. सातत्याने कुणबी नोंदी सापडत आहेत आणि हे आरक्षण मिळणे चालूच आहे. त्यामुळे मराठा समाज खूप आनंदी आहे. घराघरातील मराठ्यांच्या लेकरा बाळांचं कल्याण होत आहे. त्यामुळे लोक माझ्यावर प्रेम करत आहेत.