ध्यास विश्वसार्ह बातमीचा

… तर हिंदू समाजाने कडवट भूमिका घ्यावी लागेल ; आ.राणे आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात शिवजयंतीमध्ये झालेल्या वादग्रस्त विधानाने आता राज्यात नवा वाद पेटला आहे. यात आता भाजपचे नेते नितेश राणे यांनी उडी घेत आपली भूमिका मांडली आहे.

भाजपचे नेते नीतेश राणे म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे (सेक्युलर) होते हे डोक्यात भरण्याचे षडयंत्र सुरू आहे. पण हिंदू धर्म टिकला पाहिजे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले. अन् ते हिंदूचे राज्य म्हणून पुढे आणले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात जो लढा दिला तो इस्लामिक आक्रमकणांच्या विरोधातच होता. ज्याच्याविरोधात महाराज लढले त्यात मिर्झाराजे जयसिंग सोडले (ते ही मुघलांनीच पाठवलेले) तर सर्व जण खान सारखेच होते.

नीतेश राणे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे (सेक्युलर) होते हे डोक्यात भरण्याचे षडयंत्र सुरू आहे. त्यांनी स्वराज्य का निर्माण केले, इस्लामिक आक्रमण काय होते, आपली मंदिर का तोडली जात होती, आपल्या माता-भगिनींची अब्रु का लुटली जात होती, गो हत्या कशा सुरू होत्या. हे सर्व थांबल्या पाहिजे, हिंदू धर्म टिकला पाहिजे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले.

नीतेश राणे म्हणाले की, हिंदुना दाबण्यासाठी, स्वत:ची दुकाने चालवण्यासाठी शिवरायाबद्दल अपप्रचार सुरू आहे, याची आपण सर्वांनी दखल घेतली पाहिजे. ज्यांचे नाव न घेता आपला एकही दिवस जात नाही, ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण दैवत मानतो त्यांचा इतिहास पुसण्याचे षडयंत्र रचले जात असेल किंवा प्रतिमा खराब होत असेल तर हिंदू समाजाने कडवट भूमिका घ्यावी लागेल.

नीतेश राणे म्हणाले की, कडवटपणा आणि कट्टरपणा ही आजच्या काळाची गरज आहे. छावा चित्रपट सर्व ठिकाणी सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना किती हाल करत मारले हे दाखवण्यात आले आहे, तेव्हा कुठे ही आग लोकांमध्ये वाढत चालली आहे. पण असे चित्रपट काढून मोहमंद पैंगबर यांच्याबद्दल करुण द्यावी लागते का?, असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.

नीतेश राणे म्हणाले की, शिवराय आणि संभाजीराजेंनी आपल्यासाठी काय केले हे विसरुन चालणार नाही. औरंगजेबाने संभाजीराजेंना धर्मांतर करण्यास सांगितले तेव्हा संभाजीराजेंनी उत्तर दिले की तू आमच्या धर्मात ये तुला अजून मोठे करु. आता आपल्याला साधी बोटावर सुरी मारली तर आपण समोरचा म्हणतोय तसे करतो. पण शंभुराजेंनी 40 दिवस यातना सहन करुनही आपला धर्म सोडला नाही. नीतेश राणे म्हणाले की, सरकार हिंदुत्ववादी विचाराचे आहे. तुमचा पालकमंत्री कडवट हिंदुत्ववादी आहे, आपल्या जिल्ह्यात कोणाही हिंदूकडे वाकड्या नजरेने पाहत असेल तर मला फोन करा तो शुक्रवारी त्या ठिकाणी जाणार नाही, याची काळजी मी घेईल. आपले शासन फार बेक्कार आहे. सावंतवाडीत सुरू आहे त्यावर माझे लक्ष आहे, सर्व माहिती मी जमा करतोय. मग कशी एक-एक विकेट पडते हे दिसेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!