ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ : सुळे यांचे टीकास्त्र !

मुंबई : वृत्तसंस्था

शरद पवारांच्या राष्ट्रवादी अजित पवारांनी मोठे बंड केल्यानंतर आता राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय विरोधात गेला तर त्याला सर्वोेच्च न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे. आमचे आमदार अपात्र ठरले तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. कारण, निवडणूक आयोगाने या प्रकरणी पक्ष स्थापन करणाऱ्याचाच पक्ष हिसकावून घेण्याचे पाप केले आहे, असे त्या म्हणाल्यात.

दरम्यान, सुप्रिया सुळेंनी यावेळी निवडणूक आयोगाच्या निकालावरही टीका केली आहे. ”राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना, संस्थापक सदस्य आणि अध्यक्ष शरद पवारच आहेत. त्यामुळे संस्थापक सदस्याकडून, ज्यानं पक्ष स्थापन केला, त्याच्याकडून पक्ष हिसकावून घेण्याचे पाप अदृश्य शक्ती करत आहे. हा पक्षातच नाही, तर देशात एक नवीन पायंडा पाडला जातोय. कारण एखादा निर्णय फक्त एखाद्या व्यक्तीबद्दल सीमित नसतो. इतिहासात त्याची नोंद होते. ज्या माणसानं पक्ष काढला, त्याच्यावर अन्याय करून त्याचं चिन्ह आणि पक्ष हिसकावून घेतला जातोय. त्याच्याविरोधात आम्ही कोर्टात गेलो आहोत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे. “अशोक चव्हाणांबाबत मला आश्चर्य वाटत आहे. कारण श्वेतपत्रिकेची चर्चा गेल्या आठवड्यात संसदेत झाली. त्यावर भाजपाच्या मुख्य नेत्यांनी आदर्श घोटाळा व अशोक चव्हाणांचं नाव घेतले होते. निर्मला सीतारमण यांनी अशोक चव्हाण यांचे नाव घेतले नव्हतं, पण आदर्श घोटाळ्यावर बोलल्या होत्या. त्यामुळे आधी आरोप करा आणि आठ दिवसांत त्यांना पक्षात घ्या असा नवीन ट्रेंड भाजपानं सुरू केला आहे”, असा टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावला. तसेच शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून सुप्रिया सुळे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. ”केंद्र आणि राज्यातील सरकार हे असंवेदनशील आहे असे त्या म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!