ध्यास विश्वसार्ह बातमीचा

समाजाने आता संयम सोडू नये ; जरांगे पाटलांचा सल्ला

वडिगोद्री : वृत्तसंस्था

स्वतःला मराठा म्हणवून घेणारी नेतेमंडळी आपापल्या पक्षासाठी माझ्यावर अक्षरशः तुटून पडल्याचे चित्र गेल्या काही दिवसांत पाहायला मिळाले. मराठा समाजाचे राज्यात कुठेही आंदोलन सुरू नसून आपल्याला आंदोलन करायचे नाही. जाणीवपूर्वक आपल्याला उचकावण्याचे काम सुरू असून आपल्याला आपला संयम ढळू द्यायचा नाही, ज्याला जे बोलायचे ते बोलू द्या, आपण कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही, अशा शब्दात मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी समाजबांधवांना संयम राखण्याचा सल्ला दिला.

अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी चर्चा करताना जरांगे पाटील म्हणाले, सर्व पक्षांतील मराठा आमदारांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हक्काचे असल्याचे आपापल्या नेत्यांना समजावून सांगणे आवश्यक आहे. १४ ते २० ऑगस्टदरम्यान राज्यातील २८८ विधानसभांचा आढावा घेणार असून २९ ऑगस्ट रोजी निवडणूक लढवण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. २८८ मध्ये एससी, एसटीसाठी सुटलेल्या राखीव जागांचाही विचार केला जाणार आहे. राजकीय पक्षांच्या आघाड्यांना लोक कंटाळले असून आपण अपक्षच बरे असल्याचे ते म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिके संदभर्भात बोलताना आपण त्यांचा आदर करतो. त्यांच्या टिप्पणीवर आपण भाष्य करणार नसल्याचे म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!