सोलापूर, दि.२४ : मध्य रेल्वेने सोलापूर विभागातील प्रवाशांच्या मागणीनुसार आणि सुविधासाठी गाडी सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दिनांक 01.03.2021पासून गाडी क्र. 01158/01157 सोलापूर-पूणे-सोलापूर सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस पुढील आदेश येईपर्यत धावेल. सदर गाडीचे सर्व कोचेस आरक्षित असतील.गाडी क्र. 01158 सोलापूर-पूणे सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस दिनांक 01.03.2021 पासून पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे. सदर गाडी सोलापूर स्थानकावरून आठवड्यातून पाच दिवस (सोमवार, ,मंगळवार, बुधवार, गुरूवार आणि शुक्रवार ) रोजी सकाळी 06.30 वाजता सुटेल आणि पुढील स्थानक कुर्डुवाडी आगमन सकाळी 07.17 प्रस्थान 07.20, दौंड स्थानकावर आगमन सकाळी 09.08 प्रस्थान 09.10 आणि पूणे स्थानकावर सकाळी 10.30 वाजता पोहचेल.गाडी क्र. 01157 पूणे- सोलापूर सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस दिनांक 01.03.2021 पासून पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे. सदर गाडी पूणे स्थानकावरून आठवड्यातून पाच दिवस (सोमवार, ,मंगळवार, बुधवार, गुरूवार आणि शुक्रवार ) रोजी संध्याकाळी 06.10 वाजता सुटेल आणि पुढील स्थानक दौंड आगमन रात्री 07.13 प्रस्थान 07.15, कुर्डुवाडी स्थानकावर आगमन रात्री 08.47 प्रस्थान 08.50 आणि सोलापूर स्थानकावर रात्री 10.00 वाजता पोहचेल.
• ब्रेकयान-2 + व्दितिय श्रेणी-13 + एसी चेयर कार-01 = एकूण 16 कोचस असतील.
• कोविड-19 संदर्भातील राज्य व केंद्र सरकारच्या सर्व नियमांचे पालन रेल्वे गाडीत व रेल्वे स्थानकांवर केले जाणार आहे. कोविड-19 शी निगडीत इतर सर्व खबरदारी देखील सुनिश्चित केल्या जातील. वरिल गाड्या पूर्ण गाडी आरक्षित आहे.
सर्व प्रवासी नागरिकांना नम्र विनंती आहे कि वरील विशेष गाडीचा लाभ आपल्या प्रवासादरम्यान घ्यावा व आपला प्रवास सुनिश्चित करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.