सोलापूर : प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी सकाळच्या सुमारास मुळेगाव तांडा, वडजी तांडा व बक्षीहिप्परगा तांडा आठ परिसरात टाकलेल्या छाप्यात गुन्ह्यात १६ हजार ४०० लिटर रसायनासह ४०० लिटर हातभट्टी दारू जप्त केली.
सविस्तर वृत्त असे कि, जिल्हाभरात अवैध दारूविरुद्ध मोहीम बुधवारी यांच्या राबविण्यात येत असून अधीक्षक नितीन धार्मिक नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी तांडा, वडजी तांडा व बक्षीहिप्परगा तांडा या ठिकाणी टाकलेल्या धाडसत्रात आठ गुन्हे नोंदवण्यात आले. मुळेगाव तांडा येथील एका काटेरी झुडपात आशा पप्पू राठोड (वय ३६) या महिलेच्या ताब्यातून आठ प्लास्टिक बॅरलमध्ये साठवून ठेवलेले सोळाशे लिटर रसायन जागीच नाश केले. आणखी दोन ठिकाणी छापे टाकून २४ प्लास्टिक बॅरलमधील ४८०० लिटर रसायन व दोन भट्टी बॅरलमधील अंदाजे २०० लिटर रसायन असा मुद्देमाल जप्त करून जागीच नाश केला.
तसेच बक्षी हिप्परगा येथील एका ठिकाणाहून १२ प्लास्टिक बॅरलमध्ये ठेवलेले २४०० लिटर रसायन जप्त केले. एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक धनाजी पवार यांच्या पथकाने देसू जीवला चव्हाण (वय ५१) या इसमास गोंधळे वस्ती परिसरात सायकलवरून दोन रबरी ट्यूबमध्ये पन्नास लिटर हातभट्टीची दारू वाहतूक करताना अटक करुन त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या संपूर्ण कारवाईत एकूण सहा लाख एक्कावन्न हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला