ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी बस पलटी

9 प्रवासी गंभीर जखमी

सोलापूर वृत्तसंस्था 

ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा एसटी आगारची एसटी बस करमाळा -कर्जत रस्त्यावर रायगाव(ता.करमाळा) जवळ पलटी झाली. यातील 9 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. रायगावजवळ वळणावर स्टेअरिगंचा राॅड तुटल्याने ड्रायव्हरचे नियत्रंण सुटले आणि हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

करमाळा आगाराची करमाळा-कर्जत ही बस कर्जत वरून करमाळ्याकडे येत असताना रायगाव जवळ ही एसटी बस पलटी झाली आहे या बस मध्ये साधारणपणे 30 प्रवासी होते या प्रवाशा पैकी नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत तरी इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत जखमी मध्ये एका प्रवाशाचा हात तुटला आहे तर एक आठ वर्षीय मुलाच्या पाठीला जोराचा मार लागल्याचे सांगण्यात येत आहे

प्रवाशांना बसची पुढील काच फोडून तसेच आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी बचावासाठी रायगाव परिसरातील लोकांनी सहकार्य केले ॲम्बुलन्स बोलवून जखमींना उपचारासाठी करमाळा येथे पाठवण्यात आले आहे. स्टेअरिंगचा राॅड तुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे पण हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समोर आलेले नाही. या बसमधून काही विद्यार्थीही प्रवास करत होते पण त्यांना इजा झाली नाही. ते सुखरुप बाहेर पडले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!