ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रेल्वेने सोलापूरहून पुण्यात पोहचा सव्वातीन तासांत

सोलापूर, वृत्तसंस्था 

सोलापूरहून पुणे, मुंबई तसेच चेन्नई, हैद्राबाद दरम्यान रेल्वे गाड्या आता सुसाट धावू लागल्या आहेत. या मार्गावर सोमवारपासून (दि. 6) प्रवाशी गाड्या ताशी कमाल 130 किलोमीटर वेगाने धावण्यास सुरुवात झाली आहे. या मार्गावर वाढलेल्या वेगाने सोलापूरहून प्रवास करणार्‍या प्रवाशांना पुण्यात अवघ्या सव्वातीन तासांत पोहोचणे शक्य झाले आहे. यामुळे सोलापूरकरांचा प्रवास सुसाट झाला आहे.

वाडी-सोलापूर-दौंड (341.80 किमी) लोहमार्गावर धावणार्‍या 44 जोडी एलएचबी कोच रेल्वेगाड्यांचा अधिकतम वेग ताशी 110 किलोमीटरवरुन वाढवून ताशी 130 किलोमीटर करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून अनेक कामे सुरू होती. यामुळे 20 किलोमीटर प्रति तास वेग वाढल्याने वाडी ते दौंड सरासरी 35 ते 40 मिनिटांची बचत होणार आहे. वाडी-सोलापूर-दौंड दरम्यान अनेक तांत्रिक चाचण्या केल्या. त्यानंतर या मार्गावर ताशी 130 किलोमीटर वेगाने रेल्वे धावण्याच्या निर्णयास परवानगी दिली आहे. प्रथमच या मार्गावर या वेगाने रेल्वे धावणार आहेत. यामुळे रेल्वे प्रवास 35 ते 40 मिनिटांनी कमी होणार आहे.

या मार्गावर धावणार्‍या उद्यान, हसन, कोईमतुर, कराईकल, कोणार्क, उद्यान, शताब्दी, सिद्धेश्वर, हुतात्मा, चेन्नई, काकीनाडा, बिकानेर, यशवंतपुर, इंटरसिटी, विशाखापट्टणम, नागरकोईल, काकीनाडा, के.के. यासह अन्य 44 गाड्या ताशी 130 किलोमीटर वेगाने धावणार आहेत.

वाडी-सोलापूर-दौंड रेल्वे मार्गावर गेल्या काही दिवसांपासून अनेक कामे सुरू होती. या मार्गावरील रुळांची क्षमता वाढवली गेली. त्यानंतर अधिकार्‍यांनी या मार्गाची तांत्रिक तपासणी केली. त्यानंतर त्यात पुन्हा काही बदल केले. त्याचप्रमाणे सोलापूर रेल्वे प्रशासनाने काही बदल केले. त्यानंतर या मार्गावर रेल्वे गाड्यांचा वेग वाढविण्यास परवानगी दिली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!