सोलापूर : सोलापूर उजनी दुहेरी पाईपलाईनचा विशय आता मार्गी लागला आहे. गेल्या कोरोनामुळे तसेच भूसंपादनामुळे गेल्या दोन वर्शापासून दुहेरी पाईपलाईनचं काम पूर्णपणे ठप्प होतं. आता नव्या मक्तेदाराला हे काम देण्यात आलंय. याबाबतची अधिक माहिती स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे पाटील यांनी दिली.
लक्ष्मी इंजिनिअर्स या कंपनीला हा ठेका मिळाला आहे.गुरुवारी याची वर्कऑर्डर स्मार्ट सिटी कंपनीनं त्यांना दिली आहे. लक्ष्मी इंजिनिअर्सने 1.67 टक्के बिलोने टेंडर टाकल्याने त्यांना ठेका मिळला आहे. त्यातून स्मार्ट सिटीची 4 कोटी रुपयांची बचत होणार आहे. 24 महिन्याच्या आत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. कंपनीने आता पाईप खरेदीस सुरुवातही केलीय. सोलापूर – पुणे रस्त्याच्या डाव्या बाजूने राश्ट्रीय महामार्गाच्या जागेतून ही पाईपलाईन टाकण्यात येणार आहे.राश्ट्रीय महामार्ग कंपनीने यास मंजूरी दिली आहे. त्यामुळे भूसंपादनाचा प्रष्न मिटला आहे.
110 एमएलडी पाणी दुहेरी पाईपलाईन मधून येणार होते परंतु नव्या टेंडरनुसार त्यात दिडपट वाढ झाली आहे. दररोज सुमारे 170 एमएलडी पाणी येणार आहे अषी माहिती त्रिंबक ढेंगळे पाटील यांनी दिलीय. दोन वर्शात हे काम पूर्ण झाल्यास सोलापूरकरांना दरराजे पाणी मिळणार आहे. त्याच बरोबर उजनी धरणातील पाण्याची बचतही होणार आहे.