---Advertisement---

महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांची सुरक्षा राज्य सरकारने काढली, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या काळातील बड्या नेत्यांची सुरक्षा काढली आहे. मात्र मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे, तर जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा जैसे थे ठेवण्यात आली आहे. यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याने चर्चा होत आहे. कारण मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जातात, मात्र मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची झालेली भेट ही चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर आता त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याने चर्चेला अधिकच जोर आला आहे. नार्वेकरांना एक्स दर्जाची सुरक्षा होती, आता त्यांना वाय प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

ज्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आले त्यामध्ये माजी मंत्री छगन भुजबळ, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, माजी गृहराजयमंत्री सतेज पाटील, भास्कर जाधव, माजी सहकार मंत्री विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, नवाब मलिक, सुनील केदार, नरहरी झिरवळे, वरूण सरदेसाई, डेलकर परिवार यांचा समवेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!