ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित विशेष पोषण संवाद मेळावा संपन्न; केंद्रीय संचार ब्यूरोचा विशेष उपक्रम

किशोरावयीन मुली व मातांची हिमोग्लोबिन व आरोग्य तपासणी

अक्कलकोट : भरडधान्यांचे आहारातील महत्त्व जाणून घेऊन त्याचा वापर दैनंदिन आहारामध्ये करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सोलापूर येथील कृषि विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान विभाग प्रमुख डॉ अनिता सराटे-शेळके यानी आज येथे केले. भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो व महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या सयुंक्त विद्यामाने ग्रामपंचायत जेऊर येथील श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक मंगल कार्यालयात विशेष पोषण संवाद मेलावाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळ व्यासपीठावर सरपंच पार्वती झंपले, उपसरपंच काशीनाथ पाटील, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी हरेश सुल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप शेंडगे, सहायक संचालक वित्त व लेखा अधिकारी वर्षा बांगर, तहसिलदार अक्षय रासने, पल्लवी आखरे, माजी सरपंच शिवाजी कलमदाने, सामाजीक कार्यकर्ता नागनाथ सुरवसे, वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीकांत शिंदे, तालुका कृषी अधिकारी उमेश काटे विस्तार अधिकारी बी एस तुळजापुरे आदि मान्यवर उपस्थित होते.

 

डॉ. शेळके म्हणाल्या की, महाराष्ट्रामध्ये विशेषता: सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याचे सेवनही केले जाते. ज्वारीची भाकरी पचायला खूप हलकी असते. त्यात पोटॅशिअम, फॉस्फरस, कॅल्शिअम, लोह आणि जस्त आढळते. ज्वारीयुक्त आहारामुळे पोटाचे आजार, त्वचेचे आजार कमी होण्यास मदत होते. आजारी व्यक्ती किंवा लहान बालकांसाठी ज्वारीची भाकरी दूध रबडीचा आहार पचनास सुलभ होते. नाचणीमध्ये कोणत्याही अन्य भरडधान्यांपेक्षा या प्रकारात सर्वाधिक कॅल्शिअम असते. मधुमेह आजारासाठी पथ्यकारक धान्य म्हणूनही नाचणी उपयुक्त ठरू शकते. यातील तंतुमय पदार्थांमुळे बद्धकोष्ठता, कोलेस्टेरॉल आणि आतड्यांसंबंधी कर्करोग याला आळा बसतो. दररोजच्या सेवनामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते. नागली धान्यातील लोह अशक्तपणा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.

गरोदर मातंचे 1000 दिवस अत्यंत महत्वाचे असतात. या कालावधीमध्ये माताची विशेष कालजी घ्यावी लागते. यामध्ये पोष्टिक आहार व नियमित आरोग्य तपासणी आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी हरेश सुल यानी केले.
सहायक संचालक वित्त व लेखा अधिकारी वर्षा बांगर म्हणाल्या की, लहान बालकाना नियमित पौष्टिक व सकस आहार देण्यात यावा. जेनेकरून बाळ निरोगी व सुदृढ़ बनत. दररोज आपल्या घरात बनवलेला आहरच बाळाला द्यावा त्याना बाहेरिल तेलकट व उघडयावरचे पदार्थ खयायला देऊ नयेत. त्यामुले बालाचे योग्य पोषण होण्यास अड़थळा येतो.
वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीकांत शिंदे यानी आरोग्य विभागाकडून 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2022 पर्यंत राबविण्यात येत असलेल्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियाना अंतर्गत प्रत्येक मातंची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेऊर ग्राम दैवत श्री काशीविश्वेश्वर व ज्ञानज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार घालून दीपप्रज्वल्लन करण्यात आले. कार्यक्रमाच्या पूर्वी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी,कन्नड व उर्दू शाला व श्री काशीविश्वेश्वर विद्यालयातील मुलांसाठी पोषण रांगोली, चित्रकला, हस्ताक्षर लेखन स्पर्धा घेण्यात आले. गरोदर व स्तनदा मातासाठी सुदृढ़ बालक व पाककृती स्पर्धा घेण्यात आले. या स्पर्धेतील विज्येताना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. सेवा पंधरवड़ा निमित विवाह नोंदणी दाखले, पंतप्रधान महा आवास व रमाई आवास योजनेतील लाभ्यार्त्यंना प्रशासतीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच एकतमिक बाल विकास कार्यालयातर्फे बेबी केयर किट चे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव यानी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आंगनवाड़ी पर्यवेक्षिका सुरेखा कोली, ग्रामविकास अधिकारी एस एस कोली, केंद्रीय संचार ब्यूरोचे जे एम हननुरे, ग्रामपंचयात कार्यालयाचे कर्मचारी, गावातील सर्व आंगनवाड़ी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर्स आदिनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!