---Advertisement---

भाविकांसाठी संतोषकुमार इंगळे यांच्यातर्फे नाष्टाची सोय

By team
On: November 16, 2024 5:33 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट वृत्तसंस्था 

त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने पुण्याहून अक्कलकोटकडे स्वामी समर्थ दर्शनासाठी पालखी सोहळा निघाला असून, या यात्रेत सहभागी भाविकांसाठी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोषकुमार इंगळे यांनी कर्जाळ येथे महामार्गावर स्वामी वाडा या हॉटेलवर चहा, पाणी आणि नाष्ट्याची सोय केली आहे. भाविकांना या सोहळ्यात अक्कलकोटपर्यंतच्या प्रवासात कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी विश्रांतीसाठी थांबा आणि आवश्यक सुविधा पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

पालखी सोहळ्याचे महत्त्व लक्षात घेऊन संतोषकुमार इंगळे यांनी हे सामाजिक कार्य हाती घेतले आहे. या सोहळ्यात सहभागी भाविकांना मार्गावर वेळोवेळी चहा, पाणी आणि नाश्ता पुरवला जात असून, त्यांच्या सेवेसाठी स्वयंसेवकांची खास टीम कार्यरत आहे. या सेवेमुळे भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!