ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ग्राहकांना खास ऑफर : SBI देणार दुप्पट परतावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या भविष्याची चिंता नेहमीच असते. त्यासाठी आपण अनेक गुंतवणूकीचे पर्याय पाहात असतो. वाढत्या वयात किंवा मुलांच्या शिक्षणासाठी अधिकचा खर्च कसा निघेल यावर भर असतो. यासाठी SBI ची आपल्या ग्राहकांना खास ऑफर देत आहे. यामध्ये ग्राहकांचे पैसे काही दुप्पट होऊ शकतात. SBI ने WeCare FD योजनेतील गुंतवणुकीची योजना आणली आहे. या योजनेत ५ लाखांची गुंतवणूक केल्यास काही वर्षांनी १० लाखांचा परतावा मिळू शकतो. या गुंतवणूकीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत आहे.

SBI ची ही योजना वयोवृद्धांसाठी राबवण्यात आली आहे. यामध्ये बँक कोणत्याही FD वर सामान्य ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ नागकिकांना ०.५० अधिक व्याज देते. SBIWecare वर ७.५० टक्के व्याज मिळत आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक किमान ५ वर्षे आणि कमाल १० वर्षांसाठी केली जाते. जर तुम्ही ५ लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला थेट मॅच्युरिटीवर १० लाख रुपये मिळतील. SBI ने घोषित केलेल्या योजनेनुसार या योजनेची अंतिम तारीख ३१ मार्च २०२४ पर्यंत आहे. यामध्ये ग्राहकांना सगळ्यात चांगले व्याज मिळत आहे.

SBI ने बँक आपल्या ग्राहकांना WecareFD वर ७.५ टक्के व्याज देते. या व्याजदरात १० वर्षात पैसा दुप्पट होईल. ५ लाखांसाठी तुम्हाला १० वर्षात ५.५ लाख रुपये व्याज मिळेल. बँक नियमित एफडीवर १० वर्षांच्या एफडीवर ६.५ टक्के व्याज देत आहे. SBI त्यांच्या FD वर ३.५० टक्के ते ७.६० टक्के व्याज देते.

SBI Wecare FD च्या स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला ७.५ टक्के दराने व्याज मिळते. SBI च्या योजनेत ग्राहकांना नियमित FD पेक्षा ०.३० टक्के जास्त व्याज मिळते. जर तुम्ही ही FD ची योजना घेतली तर तुम्हाला कर्ज देखील मिळू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!