दुधनी : येथील मिट्टी की खुशबू अगरबत्ती यांच्यावतीने आणि युवकांच्या पुढाकाराने रन फॉर नेचर, दुधनी मॅरेथॉन २०२१ स्पर्धेचे आयोजन करण्यात आला होता. याला दुधनीकरांनी भर-भरुन प्रतिसाद दिला. निसर्गाचा संवर्धन, कोरोना लसिकरण, महिला सशक्तीकरण व स्वच्छ भारत अभियानाला गती मिळावे या उद्देशने दुधनी मॅरेथॉन २०२१ स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. या स्पर्धेचे उद्घाटन दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. या स्पर्धेत एकुण १८० स्पर्धकांनी सहभागी झाले होते. एकुण तिन गटांमध्ये याचे विभाजन करण्यात आले होते.
विरक्त मठापासून या मॅरेथॉनला सुरुवात करून सिद्धेश्वर चौक, सय्यद बाहोद्दीन दर्गा चौक, गांधी चौक मार्गे विरक्त मठा जवळ याचा समारोप झाला. सोळा वर्षाच्या पुढील गटात प्रदीप माने याने प्रथम क्रमांक, नागनाथ चिंनमुडे, द्वितीय तर लक्ष्मण कोळी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. दहा ते पंधरा गटात सोहेल नदाफ याने प्रथम क्रमांक, पंचप्पा जाधव द्वितीय तर वीरभद्र कलबुर्गी याने तृतीय क्रमांक पटकावला. पाच ते दहा वर्षाच्या मुला आणि मुलींच्या गटात शुभम नुला, अनिकेत देवकर, जावेद अख्तर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला.
स्पर्धेतील विजेत्यांना मिट्टी की खुशबू अगरबत्ती आणि इव्हेंट पार्टनर्सकडून ट्रॉफी, सर्टिफिकेट, रोख रक्कम, मेडल, टी-शर्ट, रोप भेट स्वरुपात देण्यात आला. मॅरेथॉन स्पर्धासाठी यशस्वी करण्यासाठी आरोग्यकर्मचारी, शिकक्ष व शिक्षकेतर कर्मचारी, अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाणे अंकीत दुधनी पोलिस कर्मचारी, आणि मिट्टी कि खुशबु टिम व दुधनीतील नगरिकांचा सहकार्य लाभले.
मिट्टी की खुशबू अगरबत्ती, एक्वाफिशर ड्रॉप शांभवी इंडस्ट्रीज, हिरो गणेश शोरूम अॅंटोमोबाईल, भरतिय आयुर्विमा विमा सल्लागार संजय मंथा, गुरुदत्त ज्वेलर्स दुधनी यांनी या स्पर्धेचे स्पॉनसर म्हणुन सहकार्य केले.