सोलापूर,दि.23: राज्य शासनाने मुद्रांक शुल्क दरात 31 मार्च 2021 सवलत जाहीर केली आहे. या सवलतीच्या दरात मुद्रांक शुल्क भरुन निष्पादीत केलेले दस्त 31 जुलै 2021 पर्यंत नोंदणी करुन घेतले जातील, अशी माहिती सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद गिते यांनी आज दिली.
राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात 31 मार्चपर्यंत दोन टक्के सवलत दिली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी घरे घेण्याकडे ओढा वाढला आहे. मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर सवलतीचा लाभ घेण्यासाठी दस्त नोंदणी करण्यासाठी नागरिक गर्दी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे श्री. गिते यांनी सांगितले.
सोलापूर शहरातील उत्तर एक, दोन आणि तीन आणि दक्षिण दुय्यम निबंधक कार्यालय येत्या शनिवारी, रविवारी म्हणजेच 27 आणि 28 मार्च रोजी सुरु राहणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 10 ठिकाणी असणारी दुय्यम निबंधक कार्यालये येत्या शनिवारी दि. 27 मार्च रोजी सुरु राहणार आहेत. तरी नागरिकांनी दस्त नोंदणीसाठी गर्दी न करता दस्त निष्पादीत करुन दस्त नोंदणी पुढील चार महिन्यात करुन घ्यावी, असे आवाहन श्री. गिते यांनी केले आहे.