अक्कलकोट,दि.२५ :अक्कलकोट गुरव समाज मंडळाचे विविध सामाजिक कार्ये व उपक्रमाची दखल घेऊन शनिवारी सांगली येथे राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार अखिल गुरव समाज संघटना राज्यअध्यक्ष अण्णासाहेब शिंदे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
अक्कलकोट गुरव समाज मंडळ मागील वीस वर्षांपासून ५०० सार्वजनिक मुंजी, २५० वधु वरांचे मेळावा, विविध क्षेत्रात यश प्राप्त गुणवंताचे सन्मान, महिला मेळावा, हळदी कुंकू कार्यक्रम, वृक्षारोपण, समाजातील निराधारांना शैक्षणिक आर्थिक मदत असे विविध कार्ये आतापर्यंत अविरतपणे सुरू ठेवले आहे.
नुकतेच लोकवर्गणीतून मोफत वसतिगृहासाठी १३ हजार स्क्वेअर फूट जागा खरेदी असे अनेक उपक्रम राबविले आहे. त्याची दखल घेऊन सालाबादप्रमाणे दिला जाणारा कै.दादासाहेब देशमुख पुरस्कार राजाध्यक्ष शिंदे यांनी जाहीर केला होता. त्याचे शनिवारी सकाळी ११ वाजता सांगली येथे आयोजित कार्यक्रमात अक्कलकोट गुरव मंडळाला स्मूर्ती चिन्ह, शाल, श्रीफळ, सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी गुरव समाज राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे,अविनाश महासागर, रंगनाथ गुरव, वैजयंता शिंदे, सुधाकर खराटे, शिवाजीराव साखरे, स्मिता गुरव, श्रद्धा साखरे, शिवाजीराव पाटील, सुभाष शिंदे, दत्तात्रय गुरव, सांगली जिल्हाध्यक्ष सचिन गुरव यांच्यासह अक्कलकोट गुरव मंडळ अध्यक्ष शिवानंद फुलारी, सहसचिव विद्याधर गुरव, सदस्य बसवराज फुलारी, स्वामींनाथ गुरव, उदय पाटील, सुरेश पुजारी, इरेश धानशेट्टी आदीजण उपस्थित होते.