शहरातील विविध समस्यां संदर्भात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन ; प्रश्न लवकर मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशारा
दुधनी दि. २२ : दुधनी शहरातली विविध समस्यां संदर्भात दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे यांच्या नेतृत्वात काँग्रेस युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांच्यावतीने मुख्याधिकरी आतिश वाळुंज यांना निवेदन देण्यात आले.
शहरातील काही भागात रोज रस्ते सफाई होत नाही. काही भागात कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडी येत नाही अशी ओरड सुरू आहे. कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडी येत नसल्याने त्या त्या भागातील प्रत्येक घरा-घरांमध्ये कचरा मोठया प्रमाणात साचले आहे. शहरातील काही भागातील गटार तुंबले आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्त्याना हप्ता वेळेवर मिळत नाहीये. रमाई आवास योजना अंतर्गत कामे थांबले आहेत. ती कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावे, शहरांतील विविध गल्ली बोळात सार्वजनिक पथदिवे बंद पडली आहेत. ते त्वरित दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
जून महिना महिना लोटत आले तरी पावसाचा पत्ता नाही. उन्हाचे तीव्र चटके लागत आहे. अशा स्थितीत दुधनी शहरात आठ – दहा दिवसात एकदा पाणी पुरवठा होत आहे. पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहे. तरी काही उपाय योजना करून एक किंवा दोन दिवसा आड पाणी पुरवठा करण्यात यावे. पाणीपुवठा विभागात साहित्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडून उत्तम दर्जाचे साहित्य पुरवठा केला जातो की नाही, याची तपासणी करण्यात यावे अशी मागणी निवेदन माध्यमातून करण्यात आली आहे.
नागरिकांच्या समस्यांचे निवारण तीन ते पाच दिवसात दूर करावे अन्यथा युवक काँग्रेस आघडीच्यावतीने नगर परिषदेवर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाच्या मध्यामतून देण्यात आले आहे.
यावेळी दुधनी शहर काँग्रेस युवक आघाडीचे अध्यक्ष शशिकांत सावळसुर, माजी नगरसेवक डॉ. उदयकुमार म्हेत्रे, लक्ष्मीपुत्र हबशी, संगमनाथ म्हेत्रे, शामराव गद्दी, महांतेश पाटील, शांतेश धोडमनी, विश्वनाथ म्हेत्रे, गुरूशांत हबशी, रेवणसिद्ध पाटील, दयानंद म्हेत्रे, मल्लिनाथ कोटनुर, चंद्रकांत अल्लापुर, प्रवीण मदरी यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.
मुख्याधिकाऱ्यांनी शहरातील नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष्य द्यावे
मागील दिड वर्षांपासून नगरपरिषदेवर प्रशासकीय कारभार सुरू आहे. या काळात शहरातील काही भाग दुर्लक्षित झाले आहेत. या दुर्लक्षित भागातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे, तरी मुख्याधिकाऱ्यांनी शहरातील नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष्य द्यावे आणि समस्यातून सुटका करावी – प्रथमेश म्हेत्रे (माजी सभापती, कृ.ऊ.बा. समिति दुधनी)