ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आजी माजी आमदारांमध्ये जोरदार फिल्डिंग ; ग्रामपंचायतच्या निकालानंतर तालुक्याचे लक्ष लागले आगामी निवडणुकीकडे

कुरनूर दि.२२ : नुकत्याच झालेल्या ग्रमापंचायत निकालानंतर आता तालुक्याचे लक्ष येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकडे लागले आहे. कारण अक्कलकोट मतदासंघांतील २६ ग्रामपंचायतच्या निकालानंतर आजी माजी आमदारांनी तालुक्यावर वर्चस्व असल्याचा दावा – प्रतिदावा केला आहे.

भाजपने २६ पैकी १७ ग्रमापंचायतीवर भाजपचे वर्चस्व असल्याचं पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे. तर दुसरीकडे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी ही २६ पैकी १६ ग्रमापंचायत वर काँगेस चे वर्चस्व असल्याचे सांगितले. जरी या ग्रमापंचायत च्या निवडणुका ह्या पक्षाच्या चिन्हावर होत नसल्या तरी अप्रत्यक्ष आजी माजी आमदार यांचा या निवडणुकी मध्ये हस्थक्षेप असतोच. त्यामुळे निकालनंतर असे दावे- प्रतिदावे बघायला मिळतात. परंतु अस असल तरी आता तालुक्याचे लक्ष येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकडे असणार आहे. कारण या निवडणुका ह्या पक्षावर लढल्या जातात त्यामुळे या निवडणुकी मध्ये पुन्हा एकदा आजी माजी आमदारा मध्ये मोठी खंडाजंगी पाहायला मिळणार आहे. या निवडणुका ह्यां विधनसभेच्या पाया मानल्या जातात.

२०१९ च्या विधानसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व त्यांच्या घराण्यातील युवा पिढीने जोमान कामाला लागल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जवळचे म्हणून म्हेत्रे यांची तालुक्यात ओळख आहे. मध्यंतरी त्यांची भेट देखील घेतली होती. त्यामुळे २०१९ चा पराभव झटकून पुन्हा एकदा तालुक्यात काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी हे देवेंद्र फडणवीस चे जवळचे मानले जातात त्यामुळे त्यांना जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष पद देखील मिळाले आहे. त्यामुळे त्यांचा दबदबा तितकाच वाढलेला दिसून येत आहे. नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी सागर कल्याणशेट्टी यांनी सुद्धा आगामी निवडणूकीचे चित्र डोळ्यासमोर ठेऊन कामाला लागल्याचे दिसून येत आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर या ग्रामपंचायत च्या निकालावर जरी आज माजी आमदारांनी दावा केला असला तरी यांची ताकद येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येच दिसणार आहे. त्यामुळे आजी-माजी आमदारांमध्ये कोण बाजी मारणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्पष्ट होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!