---Advertisement---

अ‍ॅड. सर्जेराव जाधव यांच्या जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये रविवारी कार्यक्रम

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२१ : थोर समाजसेवक अ‍ॅड. कै.सर्जेराव जाधव यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्ट, विमलाबाई जाधव न्यास आणि फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने येत्या (रविवारी) दि.२५ डिसेंबर रोजी अक्कलकोटमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शरदराव फुटाणे यांनी दिली आहे.

फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या सर्जेराव जाधव सभागृहात सकाळी साडे नऊ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून मनोरमा परिवाराचे प्रमुख तथा ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत मोरे, सोलापूर वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेशराव गायकवाड, डॉ.संतोष मेहता, फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव माने यांच्यासह अतिशय शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहेत.

यावेळी सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त सुरेश फडतरे, शंकरराव पवार, संतोष जाधव – फुटाणे, शिवाजीराव पाटील, मोहनराव चव्हाण, परितोष जाधव, माधुरी जाधव आदींची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात प्रारंभी अ‍ॅड.जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन, उपस्थित मान्यवरांचा सत्कार, तालुक्यातील गोर गरीब गरजू व्यक्तींना वैद्यकीय, शैक्षणिक आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी या कार्यक्रमास बहुसंख्येणे उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.

सदैव मदतीचा हात

या संस्थेचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. यावर्षी काही निवडक गरजू लोकांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. ऍड.सर्जेराव जाधव ट्रस्ट आणि विमलाबाई जाधव न्यासतर्फे दरवर्षी हे कार्यक्रम घेतले जातात – अ‍ॅड. शरदराव फुटाणे, अध्यक्ष

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!