नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आज कोलकातातील विद्यार्थ्यानी या प्रकरणी पश्चिम बंगालच्या सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. त्यावेळी विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये जोरदार झडप झाल्याने मोठ्या प्रमाणावर लाठीमार, अश्रुधुरांच्या नळकांड्या आणि वॉटरगनचा वापर करावा लागला आहे. त्यामुळे येथेही बांग्लादेशप्रमाणे विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोलकाताच्या आरजी कर मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या महिला डॉक्टरवर ऑन ड्यूटी असताना अत्याचार करुन त्यांचा निघृण खून झाल्याने देशभर संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात मेडिकल कॉलेज प्रशासन आणि पोलिसांची भूमिका कायम संशयास्पद राहीलेली आहे. त्यामुळे सरकारविरोधात निदर्शने सुरु झालेली आहेत. आज विद्यार्थ्यांनी निदर्शने करीत पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून पोलिसांवरच चालून गेल्याने पोलिसांनी जोरदार लाठीमार केला आहे. या ठिकाणी दिल्ली प्रमाणे जमावाला पांगविण्यासाठी वॉटर गन आणि अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत. त्यामुळे जमाव अधिकच आक्रमक झाला असून परिस्थिती प्रचंड तणावाची बनली आहे. गेले अनेक दिवस कोलकाता येथील या हॉस्पिटल प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांच्या संतप्त भावना आहेत. जमावाला आवरण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा मागविण्यात आला आहे.
रवीन्द्रभारती युनिव्हर्सिटीचे एमएचे विद्यार्थी प्रबीर दास, कल्याणी युनिव्हर्सिटीचे शुभंकर हलदर आणि सयान लाहिडी या विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात निदर्शनाचे आयोजन केले आहे. या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की आम्हाला राजकारणाशी काही देणे घेणे नाही आम्हाला ममता बनर्जी यांचा राजीनामा हवा अशी मागणी त्यांनी केली आहे.