ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन : दखल घेईना सरकार ?

पुणे : वृत्तसंस्था

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे पुण्यातील आंदोलन मागील तीन दिवसांपासून सुरू आहे. राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांनी मंगळवार रात्रीपासून पुण्यातील नवी पेठेतील शास्त्री रोडवर आंदोलन सुरू केले. कृषी विभागाच्या जागा राज्यसेवा आयोगात समाविष्ट करणे, राज्यसेवा आयोग आणि आयबीपीएसच्या परीक्षांची तारीख एकाच दिवशी असल्याने त्यांच्यात बदल करणे ही प्रमुख मागणी होती.

दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाने याची दखल घेतली आहे. आता 25 ऑगस्ट 2024 रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असून नवीन परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.

माध्यमांनी या आंदोलनाची दखल घेतल्यानंतर हळूहळू राजकीय नेते आंदोलस्थळी येऊ लागले होते. आज शरद पवार MPSC च्या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेणार अशी चर्चा होती. आमदार रोहित पवारदेखील या विद्यार्थ्यांसोबत आंदोलनाला बसले होते. प्रशासन आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करत आहे. त्यामुळे शांततेचं आवाहन पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांना करण्यात आलं होंत. आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियमित राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसमोर पेच निर्माण झाला होता. यासंदर्भात सरकार दरबारी वारंवार मागणी करूनदेखील त्याची पुरेशी दखल घेतली गेली नाही, त्यामुळे अखेर या परीक्षार्थीनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरु केलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!