पुणे : वृत्तसंस्था
राज्यात सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना अनेक नेते मंडळी आपआपल्या मतदार संघातील बाप्पांच्या आरतीसाठी जात आहे. यावेळी देखील हे नेते टीका करण्याची एक हि संधी सोडत नसताना दिसून आले आहे. नुकतेच पुणे शहरातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर खा.अमोल कोल्हे यांनी विखारी टीका केली आहे.
विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये इतर पक्षातील नेत्यांच्या झालेल्या मेगा भरतीला शरीरसौष्ठव म्हणायचे की सूज, हे येत्या काळात आपल्याला कळेल. पावडर खावून बनविलेली बॉडी आणि पवार साहेबांना सोडून गेलेला नेता राजकारणात फारसा टिकत नाही, अशी टीका शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजप व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर केली. खासदार कोल्हे यांनी शहरातील विविध गणेश मंडळांना भेट देऊन दर्शन घेतले.
मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अनेक नेतेमंडळी प्रवेश करत आहे. पक्षात होणारी ही भरती मेगा भरती आहे का? या प्रश्नावर कोल्हे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावर कोल्हे म्हणाले, हे अनेकवेळा स्पष्ट झाले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधण्याचे काम क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनीच केले आहे. इतिहासाबाबत संभ्रम तयार केला जात आहे, महाराष्ट्राची जनता हे खपवून घेणार नाही, असेही कोल्हे म्हणाले.