तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट ,दि.९ : रूद्धेवाडी (ता.अक्कलकोट ) येथील मातोश्री लक्ष्मी शुगरच्या वतीने सोमवारपासुन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याकरिता अल्प दराने साखर वाटप सुरू करण्यात आल्याची माहिती मातोश्री लक्ष्मी शुगरचे चेअरमन माजीमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी दिली.
मातोश्री लक्ष्मी शुगर को-जन इंड.लि रुद्देवाडी कारखान्याचे चेअरमन सिध्दाराम म्हेत्रे यांनी चालु गाळप हंगाम मधील ऊस पुरवठादार शेतकरी व सभासद यांना सोमवार दि.१० ते २० ऑक्टोबर दरम्यान कारखाना साईटवर दिपावली सणानिमीत्त अल्पदरामध्ये २० किलो साखर प्रती किलो २० रु. प्रमाणे साखर वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्व ऊस पुरवठादार शेतकरी व सभासद यांनी कारखाना साईटवर येऊन आधार कार्ड/ सभासद पावती/ ऊस वजन पावती दाखवुन सकाळी १० ते ५ या वेळेत साखर घेऊन जाण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे.
शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार
मातोश्री लक्ष्मी शुगर – ऊस पुरवठादार शेतकरी व सभासद शेतकऱ्यांनी कारखाना साईटवरून साखर नेऊन सहकार्य करावे. शेतकरी उत्पादकांची दिवाळी गोड करावी यासाठी हा निर्णय घेतला आहे – शिवराज म्हेत्रे,मॅनेजिंग डायरेक्टर