ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ घेतला साखर आयुक्तांची भेट, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले “हे” आश्वासन

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळाने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली. सोलापूर जिल्ह्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना, श्री भीमा सहकारी साखर कारखाना, सहकार शिरोमणी साखर कारखाना, संत दामाजी साखर कारखाना यांच्यासह इतर कारखान्यांच्या एफआरपी, कामगारांच्या पगारी, ऊस वाहतूक बिले यांच्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन साखर आयुक्त पुणे यांची भेट घेतली.

ज्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊस बिले (FRP) संपूर्णपणे दिले आहेत अशाच साखर कारखान्यांना गाळप परवाना द्यावा, काही कारखाने करार करून चार टप्प्यात एफआरपी देणार असल्याचे सांगत आहेत.  व काही कारखानदार एफआरपी दिल्याची खोटी माहिती देत आहेत.  अशा सर्व कारखान्यांची सखोल चौकशी करून जोपर्यंत त्यांची 100% एफआरपी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना गाळप परवाना देऊ नये,  जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी सर्वसाधारण सभेमधून सभासद काही सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.  त्या सभासदांचे सभासदत्व कायम राहावे, काही कारखानदार काटा मारी, रिकव्हरी कमी दाखवणे,  असे प्रकार करत आहेत.  त्याच्यामध्ये लक्ष घालावे कारखान्याच्या सर्वसाधारण सभा ऑनलाईन च्या ऐवजी पूर्वीप्रमाणे ऑफलाईन घ्यावेत, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त यांच्याकडे केली आहे.

यावेळी युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन पाटील,  जिल्हा संघटक शहाजन शेख, माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर, तालुका युवा अध्यक्ष अमर इंगळे, करमाळा तालुका उपाध्यक्ष तानाजी शिंदे,  अतुल पिसे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी साखर आयुक्तांनी सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून जे कारखाने १५ ऑक्टोबर च्या आगोदर 100% एफ आर पी देतील त्यांनाच गाळप परवाना देऊ,  तसेच इतर विषयांसाठी लवकरच पंढरपूर येथे साखर आयुक्त व स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांची बैठक घेण्याचे आश्वासन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!