ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे यांचा स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे सत्कार

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या ३५ वर्षातील भक्ताभिमुख विकास झाला. तर महाप्रसाद हा सात्विक आहार व परिसर म्हणजे आरोग्यपूर्ण विहार असल्याचे मनोगत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे यांनी व्यक्त केले.

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या सवमेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आश्विन करजखेडे, डॉ.केदार सुधाकर, राजू लोकपुरे, महेश भोरे, शंकरराव कुंभार हे उपस्थित होते.

पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेवक किरण बारटक्के व उद्योगपती अमर काळे पुणे यांचा देखील न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी अँड.रमेश पाटील, प्रा.शिवशरण अचलेर, मनोज निकम, यासाचे सचिव शामराव मोरे, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, गोटू माने, अभियंता किरण पाटील, अभियंता अमित थोरात, सिद्धराम कल्याणी, एस.के.स्वामी, शहाजीबापू यादव, समर्थ घाडगे, सतीश महिंद्रकर, अतिष पवार, दत्ता माने, राजेंद्र पवार, प्रसाद हुल्ले, महेश स्वामी, धनंजय निंबाळकर, महांतेश स्वामी, स्वामींनाथ चौगुले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!