ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अन्नछत्र मंडळात फुलला भक्तीचा मळा ! पुण्यतिथी निमित्त हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद

अक्कलकोट : दि.१८ (प्रतिनिधी)
दिगंबरा दिगंबरा…. श्रीपाद वल्लभ दिगंबरा….! श्रीक्षेत्र अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय…च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात १४५ व्या श्रींच्या पुण्यतिथी निमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पहाटे रथोत्सव, विधीवत पूजा, धार्मिक कार्यक्रम, पारायण, महाप्रसाद, रक्तदान, व जिम्नॅशियमचा १५ वा वर्धापन दिन मान्यवरांच्या भेटी व सत्कार आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. अन्नछत्र मंडळात हजारो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतले. न्यासाने केलेल्या नेटक्या नियोजनाने भक्तातून समाधान व्यक्त करण्यात आले असून, अन्नछत्र मंडळात भक्तीचा मळा फुलला..!
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात गेल्या ३५ वर्षापासून श्रींची पुण्यतिथी साजरी केली जाते. या बरोबरच नगर प्रदक्षिणेच्या शेवटच्या सात दिवस रथ सप्ताह असतो, यामध्ये न्यासाच्या रथाचा सहभाग असतो. दरम्यान मंगळवारी पहाटे श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील पूजनानंतर अमोलराजे भोसले यांच्या हस्ते रथाचे पूजन करुन बुधवार पेठेतील समाधी मठाकडे मार्गस्थ करण्यात आले.
महाप्रसादालयात सकाळी स्वामींचे पारायण संपन्न झाले. दुपारी ११.३० च्या दरम्यान श्री व अन्नपूर्णा, महाप्रसादाचे पूजन आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृह राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे व मराठी अभिनेता विलास चव्हाण पुणे, डॉ.प्रसाद प्रधान ठाणे, मनसेचे राज्य उपाध्यक्ष विनायक (बंटी) म्हशीलकर यांच्यासह स्वामी भक्तांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अन्नछत्र मंडळातील नैवेद्य श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर, बुधवार पेठेतील समाधी मठात श्रींना दाखविण्यात आले. यावेळी स्वामीभक्त बहुसंख्येने उपस्थित होते.
यानंतर महाप्रसादालयात न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या मंत्र पठणाने महाआरती संपन्न झाली व आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या हस्ते संकल्प सोडण्यात आल्यानंतर भक्तांना महाप्रसाद देण्यात आला. पुण्यतिथी निमित्त अन्नछत्र मंडळातील परिसरातील रक्तपेढीच्या माध्यमातून न्यासाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी १७५ स्वामीभक्तांनी रक्तदान केले.
श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशिर्वादाने न्यासाचे विविध विकास कामांच्या बाबतीत आघाडी घेतलेली आहे. या बरोबरच न्यासाने स्वामीभक्त व शहरवासियांच्या सोयीकरिता इन व आऊट डोअर व्यायाम शाळा उपलब्ध करुन दिलेली आहे. आजवर यास उत्स्फूर्त प्रसाद मिळाला आहे. यापैकी इनडोअर असलेल्या मातोश्री श्रीमंत कांतामती विजयसिंहराजे भोसले जिम्नॅशियम सेंटरच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री हनुमान मूर्तीचे पूजन अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
१४५ व्या श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधुन अनेक मान्यवरांनी अन्नछत्राला भेट दिली. अन्नछत्र मंडळात हजारो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतले. स्वामी भक्तांमुळे झालेल्या गर्दीमुळे अन्नछत्र परिसर फुलून गेलेला होता. स्वामी भक्तांना महाप्रसादाबाबत स्वत: अमोलराजे भोसले हे पंक्तीत फिरुन आस्थेने चौकशी करीत होते.
स्वामी भक्तांनी अन्नछत्र मंडळाच्या परिसरात असलेल्या श्री शमी-विघ्नेह गणेश मंदिर, ब्रह्मांडनायक उभी स्वामींची मूर्ती, नियोजित महाप्रसादगृह इमारत, सध्याचे अद्यावत तात्पुरते महाप्रसादालय, कपिला गाय, कारंजा, शिवस्मारक, कार्यरत यात्री निवास -१ , यात्रीभुवन-२ , अतिथी गृह, आऊटडोअर व इनडोअर जीम, प्रशस्त वाहनतळ, टेकडीवरील श्री समर्थ वाटिका, शिवचरित्र प्रदर्शन हॉल, अग्निशमन, रुग्णवाहिका, आश्रयदाते कक्ष हे सर्व न्यासाने भक्तांच्या सेवेर्थ सुरु केलेल्या विविध उपक्रमांचे स्वागत करुन न्यासाचे कौतुक केले. परगावच्या आलेल्या पालख्यांचे स्वागत न्यासाच्या वतीने करण्यात आले.
महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, आंद्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, केरळ, गुजरात, उत्तराखंड, दिल्ली व जम्मू काश्मीर पंडीत, राजस्थान, उत्तरप्रदेश वाराणसी यासह देश व विदेशातील स्वामी भक्तांनी तीर्थक्षेत्री श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात येऊन हजारो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतले.याप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, संदीपदाजी फुगे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले, राजेंद्र लिंबीतोटे, लक्ष्मण पाटील, किशोर सिद्धे, अप्पा हंचाटे, मनोज निकम, प्रविण देशमुख, माजी नगरसेवक रामचंद्र समाणे, वैभव नवले, वैभव मोरे, सौरभ मोरे, प्रथमेश पवार, अभियंता किरण पाटील, अमित थोरात, रामचंद्र घाटगे, अशोकराव जाधव, पिंटू साठे, प्रवीण घाडगे, विजय माने, निखील पाटील, राहुल इंडे, मल्लिकार्जुन बिराजदार, दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, सतिश महिंद्रकर, गोरखनाथ माळी, नामा भोसले, शहाजीबापू यादव, बाळासाहेब घाडगे, समर्थ घाडगे, देवा हंजगे, संभाजीराव पवार, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, राजू पवार, गोविंदराव शिंदे, गणेश लांडगे, नितीन उण्णद, नागेश कलशेट्टी, शितल जाधव, स्वामिनाथ बाबर, लाला निंबाळकर, सिध्दाराम कल्याणी, संजय गोंडाळ, राहुल शिर्के, दत्ता म्हेत्रे, मैनुद्दीन कोरबू, काशिनाथ वाले, विश्वनाथ हडलगी, रोहित खोबरे, शिवू काळे, सिद्धेश्वर हत्तुरे, राजू म्हेत्रे, रोहित मोरे, चंद्रकांत कुंभार यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!