अक्कलकोट : अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! आई राजा उदे..! च्या जयघोषात, मंत्र पठणाने गेल्या ७ महिन्यापासून बंद असलेले श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, शासनाच्या आदेशानुसार सर्व त्या नियमांचे पालन करीत गुरुवारी घटस्थापनेच्या औचित्य साधुन महाप्रसाद सेवेकरिता न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पूर्ववत सुरु करण्यात आले.
दरम्यान प्रांताधिकारी सुप्रिया डांगे, ग्रुप कमांडर पुण्याचे एन.सी.सी. ग्रुपचे राजेश के.गायकवाड, सौ.गायकवाड, चि.यश गायकवाड, तहसीलदार बाळासाहेब सिरसट, उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, वळसंग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोसले, एस.फोर जी.हॉटेल पुणेचे संचालक संदीप कुंजीर यांच्या हस्ते तर न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे यांच्या उपस्थितीत श्रींचे पूजन व महाप्रसादाच्या पूजना नंतर श्रींच्या जयघोषात संकल्प सोडण्यात आला.
वैश्विक महामारी कोरोना कोवीड-१९ या संसर्गजन्य रोगामुळे गेल्या सात महिन्यापासून बंद होते. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ उघडण्यात येणार असल्यामुळे अन्नछत्र परिसर महाप्रसादालय, प्रतिक्षालय, यात्रीनिवास व यात्रीभूवन इत्यादी सेवकाकरवी स्वच्छ धुवून घेवून, सॅनिटायझर, फॉगिंग करण्यात आले आहे. दिनांक ७ ऑक्टोंबरपासून अन्नछत्रात येणार्या, भाविकांना कोरोना संसर्ग होवू नये म्हणून शासनाचे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. अन्नछत्र मंडळात गर्दी होवू देणार नाही, आलेल्या भाविकांस सॅनिटर करणे, मास्क व सुरक्षित अंतर पाळणे अनिवार्य करण्यात आले आहे.
याप्रसंगी न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, मेजर चंद्रकांत हिरतोट, सचिन डफळे, प्राध्यापक प्रशांत शिंपी, बापू टेकणार, मनोज निकम, विजय माने, चंद्रकांत कुंभार, माजी हवालदार सत्तार शेख, धनराज शिंदे, संतोष भोसले, किरण पाटील, प्रशांत शिंदे, बाळासाहेब पोळ, गोविंदराव शिंदे यांच्यासह स्वामी भक्त, सेवेकरी, कर्मचारी वृंद उपस्थित होते.
शासनाचे सर्व नियमांचे पालन :
गेल्या ७ महिन्यापासून बंद असलेले श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे शासनाच्या आदेशानुसार सर्व त्या नियमांचे पालन करीत गुरुवारी घटस्थापनेच्या औचित्य साधुन महाप्रसाद सेवा पूर्ववत करण्यात आल – सुप्रिया डांगे, प्रांताधिकारी सोलापूर
न्यासाचे कार्य कौतुकास्पद :
कोरोनाच्या काळात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. अन्नदान सेवेबरोबर सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. मंडळात आरोग्याच्या नियमांचे पालना बरोबरच, चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर केले जात आहे – बाळासाहेब सिरसट, तहसीलदार अक्कलकोट
न्यासाकडून नेटके नियोजन :
कोरोना संसर्गजन्य रोगामुळे बंद असलेले अन्नछत्र मंडळ पुन्हा सुरु झाले. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाय योजनेचे नेटके नियोजन करण्यात आले आहे – अनंत कुलकर्णी, पोलिस निरीक्षक, उत्तर पोलिस ठाणे, अक्कलकोट
सुरक्षित अंतर पाळणे अनिवार्य :
अन्नछत्रात येणार्याा भाविकांना कोरोना संसर्ग होवू नये म्हणून शासनाचे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. अन्नछत्र मंडळात गर्दी होणार नाही, आलेल्या भाविकांस सॅनिटर करणे, मास्क व सुरक्षित अंतर पाळणे अनिवार्य करण्यात आले आहे. कोरोना जनजागृती बाबत न्यासाच्या परिसरात मार्गदर्शक सूचनांचे फलक व उद्घोशाना करण्यात येत आहे.
-अमोलराजे भोसले प्रमुख कार्यकारी विश्वस्त, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट