अक्कलकोट, दि.१0-येथील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा साहित्यिक स्वामीनाथ हरवाळकर यांनी आपल्या आयुष्यात वाचनाचा छंद लागल्यापासून संकलित केलेले सुमारे दीड टन वजनाची पुस्तके श्रीमंत शहाजीराजे भोसले वाचनालयाला आपल्या मुलाच्या लग्नात भेट म्हणून दान दिले.
मुलगी श्रीपूर्णा हिने सांगितले बाबा पोतेभर पुस्तके तुमच्या खोलीत पडलेले आहेत ते सध्या कोण वाचत नाही आम्ही रद्दीला घालतो.त्यावेळी वडील स्वामीनाथ हरवाळकर म्हणाले. हे अजरामर साहित्य मी गोळा केलेला आहे.ते पुढच्या पिढीला वाचता यावा म्हणून मुलगी,सून,नात या सर्वांच्या वजनाइतके पुस्तके मी वाचनालयाला दान देत आहे.
वयाच्या पंधराव्या वर्षापासून स्वामीनाथ हरवाळकर यांनी ययाती, मृत्युंजय,पानिपत,छावा, छत्रपती शिवाजी महाराज यासह असंख्य दर्जेदार पुस्तके गोळा केली होती. त्याच्यासाठी एक स्वतंत्र खोली काढून वाचनालय स्थापन केले.पण सध्या युवा पिढीमध्ये वाचनाची सवय कमी होत असल्याने पुस्तके कालबाह्य होत आहेत. म्हणून मी दान देण्याचा निर्णय घेतल्याचे स्वामीनाथ हरवाळकर यांनी सांगितले. श्रीमंत शहाजीराजे भोसले वाचनालयाचे मुख्य ग्रंथपाल दत्तात्रय बाबर व दिनकर शिंपी यांच्याकडे ही सर्व पुस्तके हरवाळकर यांनी सुपूर्त केले.या कामी उद्योगपती सुधीर माळशेट्टी, नागेश कोनापुरे,शरणू आळोळी, शैलशिल्पा जाधव,अरुण जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.