ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा,कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा झाला गौरव

 

अक्कलकोट, दि.१६ : अक्कलकोट शहर आणि तालुक्‍यात देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

तहसील कार्यालय

अक्कलकोट तहसील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला प्रांताधिकारी सुप्रिया डांगे यांची उपस्थिती होती.त्यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, नगरपालिकेचे पक्षनेते अशपाक बळोरगी, तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.ध्वजारोहण कार्यक्रमानंतर कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉक्टरांचा कोव्हीड
योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

पंचायत समिती

अक्कलकोट येथील पंचायत समिती कार्यालय आवारात झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात पंचायत समितीचे सभापती आनंद सोनकांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी ,माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे ,उपसभापती प्रकाश हिप्परगी, जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, राजकुमार बंदीछोडे, गुंडप्पा पोमाजी आदींसह अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजप कार्यालय

बस स्टँड जवळ असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह शहराध्यक्ष शिवशरण जोजन, ज्येष्ठ नगरसेवक महेश हिंडोळे, मिलन कल्याणशेट्टी, माजी तालुकाध्यक्ष मल्लिनाथ स्वामी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

नगरपालिका

अक्कलकोट नगरपालिकेत झालेल्या कार्यक्रमात नगराध्यक्ष शोभा खेडगी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी मुख्याधिकारी सचिन पाटील यांच्यासह उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, नगरसेवक बसलींगप्पा खेडगी आदींसह सर्व नगरसेवक विविध विभागाचे अधिकारी ,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कॉंग्रेस कार्यालय

अक्कलकोट काँग्रेस कमिटीत काँग्रेस भवनात झालेल्या कार्यक्रमात माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे
यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळेस काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अश्पाक बळोरगी,सभापती ॲड. आनंद सोनकांबळे,उपसभापती,प्रकाश हिप्परगी, माजी सभापती महिबुब मुल्ला,जि.प सदस्य मल्लीकार्जुन पाटील,नगरसेवक महेशजी इंगळे ,नगरसेवक सद्दाम शेरीकर आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोगाव ग्रामपंचायत

अक्कलकोट तालुक्यातील गोगांव येथे झालेल्या कार्यक्रमात सरपंच वनिता सुरवसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मल्लिनाथ बिराजदार हे होते.यावेळी प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थीचे उत्कृष्ट बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांना सन्मानपत्र देऊन सरपंच वनिता सुरवसे ,उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच संघटना तालुकाध्यक्ष प्रदिप जगताप , ग्रामपंचायत सदस्य महादेवी मुलगे ,ललिता कलशेट्टी ,लक्ष्मण बिराजदार ,डॉ. लिंगराज नडगेरी,अंबिका वळसंग ,चंद्रकला गायकवाड, दयानंद चोळ्ळे , बाबुराव बनसोडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

बोरगाव दे प्रशाला

तालुक्यातील बोरगाव दे येथे श्री महादेव विद्या मंदिर प्रशालेच्या कार्यक्रमास संस्थेचे संचालक इस्माईल पठाण यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले तर मोहन काजळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक प्रभाकर बंदीछोडेर पांडुरंग पवार, शीद पठाण ,शाम देशेट्टी, संजीवकुमार हत्तरके, विजयकुमार चव्हाण,अमोल फुलारी,आनंद सुतके, अनिल देशेट्टी ,गुरुनाथ धनशेट्टी, दत्तात्रय मोरे, दरेप्पा बिराजदार, काशीनाथ जिरगे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!