---Advertisement---

काँग्रेस महिला विभागाच्या अध्यक्ष सुष्मिता देव यांनी सोडला कॉंग्रेसचा हात, तृणमुल कॉंग्रेसमध्ये केला प्रवेश

Follow Us:
---Advertisement---

 

नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी खासदार आणि महिला काँग्रेस विभागाच्या अध्यक्ष सुष्मिता देव यांनी काँग्रेसचा हात सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी तृणमूलचे राष्ट्रीय महासचिव आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाचा अभिषेक बॅनर्जी, खासदार डेरेक ओब्रायन उपस्थित होते. सुष्मिता देव यांनी काँग्रेस सोडुन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने कॉंग्रेस पक्षाला मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे.

तृणमूलमध्ये सहभागी झालेल्या सुष्मिता यांच्याकडे त्रिपुराच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. आसाममधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुष्मिता देव यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे कॉंग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. २०१४ मध्ये मोदी लाटेतीही सुष्मिता देव यांनी आसाममधील सिल्चर मतदार सांघातुन निवडणूक लढवून त्या खासदार झाल्या होत्या.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!