ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तैलाभिषेकाने श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेला भक्तिमय वातावरणात सुरुवात ; आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान रंगणार अक्षता सोहळा

दुधनी : दुधनीचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्‍वरांच्या यात्रेला शुक्रपासून भक्तिमाय वातावरणात सुरुवात झाली आहे. यात्रेनिमित श्री सिद्धरामेश्वर मंदिराला सुंदर रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्याबरोबर सिद्धेश्वर मंदिर व परिसराला मनमोहक विद्युत्त रोषणाई करण्यात आली आहे. या विद्युत रोषणाईमुळे सिद्धेश्वर मंदिर परिसर उजळून निघाले आहे. दुधनीच्या सिद्धेश्वर यात्रेला मोठी परंपरा आहे. मागील दोन वर्षात कोरोंना महामारीमुळे यात्रेवर शासनाने बंधने आणली होती. त्यामुळे भाविकांना मोठ्या संखेत सहभागी होता आला नव्हता. मात्र यंदाच्या वर्षी यात्रेवर कुठल्याही प्रकाराचे बंधन नसल्याने सिद्धेश्वर भक्तामध्ये उत्साह दिसून येत आहे.

शुक्रवारी सकाळी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या मूर्तीला रुद्राभिषेक व महाआरती आले. संध्याकाळी सहाच्या सुमारास सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत येगदी, शिवानंद माड्याळ, गिरमल्लाप्पा सावळगी, सातलिंगप्पा परमशेट्टी यांनी श्रीच्या मूर्तीला तैलाभिषेक करून तैलाभिषेकाला चालना दिली. यावेळी मलकाजप्पा अल्लापुर, शिवानंद हौदे, शरणप्पा मगी, इरय्या पुराणिक, चन्नवीर पुराणिक, महेश बाहेरमठ उपस्थित होते. 

शुक्रवारी संध्याकाळी देवस्थान कामिटीचे संदस्य निंगण्णा सोळशे, सिदधाराम मल्लाड यांच्यासह मल्लिनाथ येगदी, विश्वनाथ गंगावती, महेश गुळगोंडा यांच्यासह सिद्धेश्वर भक्तांनी शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज कि जय, शांतलिंगेश्वर महाराज कि जय, हर्र्रर्र बोला हरर्र…. ह्या जय घोष करत पारंपारिक वाद्या समवेत मार्गस्थ झाले.

त्यानंतर शहरातील महादेव मंदिर, शंकरलिंग मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हनुमान मंदिर, विरक्त मठ, रुपा भवानी मंदिर, मारी आई मंदिर, भाजीपाला मार्केट परिसरातील लक्ष्मी मंदिर, नागोबा नगर येथील हनुमान मंदिर, रेणुका नगरमधील मंदिरांमध्ये जाऊन तैल, हळकुंड लावून पान, सुपारी विडा देऊन देवी देवतांना अक्षता सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले.

यावेळी शांतलिंग वागदरी, सातलिंग अल्लापुर, सुगेश बाहेरमठ, गुरुशांत सालीमठ, सिद्धाराम जुलपे शांतलिंग बाहेरमठ, संजय बाहेरमठ उपस्थित होते. 

आज दुपारी अक्षता सोहळा 

आज शनिवार दुपारी साडेबाराच्या सुमाराला ग्रामदैवत शिवयोगी सिदधरामेश्वर महाराज यांचा विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. अक्षता सोहळ्यासाठी मंदिर समितीच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. अक्षता सोहळ्यासाठी पुणे, मुंबई, बिदर, गुलबर्गा, विजयपूरसह अन्य शहरातील  सिद्धेश्वर भक्त मोठ्या संख्येने दुधनीत दाखल झाले आहेत. 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!