ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शहरात पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्या ; व्यापऱ्यांच्यावतीने मुख्याधिकाऱ्याना निवेदन

google.com, pub-1602819151212103, DIRECT, f08c47fec0942fa0

दुधनी दि २६ : पावसा संदर्भात दुधनीकरांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात दुधनी शहर आणि परिसरात रात्री ११ ते १ वाजे दरम्यान दगफुटी सदृश्य ८२ मिलिमीटर इतका पाऊस पडला होता. यामुळे भाजी पाला मार्केट परिसरातील लक्ष्मी नगरसह मुख्य बाजार पेठेतील दुकानांसह अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेक लोक बेघर झाले होते तर लाखों रुपयांचे नुकसान झाल होत. यामुळे यंदाच्या वर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी दुधनीकरानी खबरदारी घेत नाले सफाई व मुख्य नाल्यावरील अतिक्रमण हटवण्या संदर्भात शहरातील बाजारपेठेतील व्यापऱ्यांच्यावतीने मुख्याधिकारी आतिष आळूंज यांना निवेदन देण्यात आले.

आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, तहसीलदार बाळसाहेब शिरसठ यांनी नुकसानीचे पाहणी केली होती. यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी नाल्यावरील अतिक्रमण संदर्भात गार्हाणी मांडले होते. त्यानंतर आमदार कल्याणशेट्टी यांनी पक्षपाती न करता कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार बाळसाहेब शिरसठ यांना दिले होते. मात्र अद्याप एक वर्ष उलटून गेले तरी नगरपरिषदेकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाले सफाईसह मुख्य नाल्याभोवती झालेले अतिक्रमण हटविण्यात यावी अशी मागणी दुधनीतील व्यापाऱ्यांच्या निवेदनाद्वारे करण्यात आले.

यावेळी मुख्याधिकारी आतिष वाळूंज बोलताना म्हणाले की, पावसाळा सुरू होण्यापूर्वी जी कामे करायची आहे त्याची अमलबजावणी सध्या सुरू आहे. योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. तर यावर्षी शहरात पाणी तुंबणार नाही याची आम्ही खबरदारी घेतली आहे. गेल्यावेळी जी त्रुटि आढळून आले आहेत त्या संदर्भातील काही कामांच्या मंजूरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. त्या कामांना अद्याप मंजूरी मिळाली नाही असे सांगितले.

यावेळी अनंत कासार, मल्लिनाथ मातोळी, दौलत हौदे, गुरुशांत माशाळ, मल्लिनाथ तुप्पद, आनंद बाहेरमठ, श्रीकांत भांजी, चन्नप्पा ओनामशेट्टी, शिवराज साणक, संजय मणुरे, शरणप्पा कोटणुर, रमेश चव्हाणसह बाजार पेठेतील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्तीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!