ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिक्षणाचा फायदा घेत तरुणाने उभारली सीताफळची बाग !

वाशीम : वृत्तसंस्था

गेल्या काही वर्षापासून देशभरातील अनेक शेतकरी शेतीचा व्यवसाय सुरु करून नोकरी व उद्योगाकडे वाट धरत आहे. पण सन २०१९ मध्ये कोरोनाचे सावट जगभर पसरल्यानंतर अनेक परदेशात नोकरी करीत असलेले तरुणांनी आपल्या मायदेशी येवून शेतीचा व्यवसाय सुरु करून लाखो रुपये कमवीत आहे.

वाशिमच्या रिसोड तालुक्यातील घोंसरच्या दोन पदवीधर अल्पभूधारक शेतकरी भावांनी दाखवून दिले आहे. जिद्द, मेहेनत आणि आपल्या शिक्षणाचा फायदा शेतीमध्ये घेत सीताफळ बागेचे योग्य पध्दतीने नियोजन करून २ टन सीताफळाचे उत्पादन घेत विकली आहेत. घोंसर येथील अल्पभूधारक शेतकरी विलास जाधव आणि कैलास जाधव या दोन भावांनी तीन वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेतून सिताफळाची लागवड केली. रोजगार हमी योजनेअंतर्गत लागवड केल्यामुळे अडीच एकरात १ लाख २४ हजार रुपयांचे अनुदान मिळाले. यावर्षी चांगला बहार आल्यामुळे एक लाख रुपयाचे उत्पन्न आतापर्यंत घेतले असून राहिलेल्या दोन बारमध्ये दोन लाख रुपयाचे उत्पन्न अपेक्षित आहे. मागील ३ वर्षात बागेसाठी त्यांनी ९० ते ९५ हजार रूपये खर्च केला आहे.

सीताफळाचे वैशिष्ट्य म्हणजे या पिकावर मिलीबग या त्रिप्स रसशोषक किडीवगळता अन्य कोणताही प्रादुर्भाव होत नाही. मात्र यावर्षी फूलधारण करतांना सुरुवातीला पाऊस जास्त झाल्यामुळे फळ धारणावेळी मोठ्या अडचणी आल्या. मात्र, कृषी क्षेत्रात अनुभव असल्याकारणाने जाधव यांनी कुत्रिमरित्या परागीकरण फुला फळासाठी योग्य नियोजन केले. एका आठवड्यापूर्वी विलास पाटील यांच्या सीताफळाच्या फळाचा पहिला तोडा झाला आहे. यामध्ये त्यांना ४० ते ६० रूपये किलो भाव मिळाला. आतापर्यंत जवळपास २ टन सीताफळे विकली गेली असून अजून ३ ते ४ टन फळे निघतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!