ध्यास विश्वसार्ह बातमीचा

प्रजासत्ताक दिनी तारामता प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा कलाविष्कार सांस्कृतिक कार्यक्रमांनी वेधले लक्ष

अक्कलकोट, दि.२६ : प्रजासत्ताक दिनानिमित्त अक्कलकोट येथील श्री तारामाता प्राथमिक शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले.ध्वजारोहण कार्यक्रम
फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव माने यांच्या हस्ते संचालक संतोष जाधव- फुटाणे,अमर शिंदे,दैनिक संचारचे पत्रकार मारुती बावडे,शालेय समिती सदस्या सरिता सूर्यवंशी,नेहा गोगी,शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा कदम व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडला.ध्वजारोहणानंतर
इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीने झेंडा गीत व देशभक्तीपर गीत सादर केले.शिशु विभागातील विद्यार्थ्यांनी थोर नेत्यांच्या वेशभूषा सादर केल्या.यावेळी माने यांच्या हस्ते आज वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.शिशु ते चौथीच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनावर उत्कृष्टरित्या आपले मनोगत व्यक्त केले व देशभक्तीपर नृत्यातून विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम व राष्ट्र अभिमान यांचे दर्शन घडवून आणले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम व देशभक्ती रुजविण्यात शिक्षकांचे योगदान खूप मोलाचे आहे,असे प्रतिपादन माने यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहशिक्षिका शितल गोडसे यांनी केले. तर आभार सहशिक्षिका रागिणी जाधव यांनी मांडले.कार्यक्रमास शिशु विभागाच्या संयोगिता साळुंखे, सहशिक्षिका शितल कदम ,अंजली जाधव, प्रशांत संगोळगी ,आरिफ शेख,अमोल पाटील, शितल जाधव , उमा गोंडाळ, पुनम इंगळे, सुवर्णा सुरवसे, लता शिर्के यांच्यासह विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!