ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तावडेंचे ट्विट व्हायरल : दाऊदच्या हस्तकांना कोणी हेलिकॉप्टर प्रवास घडवला !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडल्यावर आता भाजपचे नेते विनोद तावडे यांनी देखील शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. तर यासोबत विनोद तावडे यांनी ट्विट देखील केले आहे.

शरद पवार म्हणाले की, अमित शहा यांनी थोडीफार माहिती घेऊन भाषण केले तर लोकांच्या मनात शंका निर्माण होणार नाही. देशात आजपर्यंत अनेक गृहमंत्री झाले ज्यांनी पदाची प्रतिष्ठा वाढवली, असे ते देशभक्त होते. आपण तडीपार असा गृहमंत्री पाहिलेला नाही असा टोला त्यांनी शहांना लगावला. गुजरातमध्येही अनेक प्रशासक होऊन गेले. या सगळ्या प्रशासकांचे वैशिष्ट्य होते, की यापैकी कुणालाही तडीपार केले गेले नव्हते.

https://x.com/TawdeVinod/status/1879414530956275956?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1879414530956275956%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=about%3Asrcdoc

 

भाजपचे नेते विनोद तावडे म्हणाले की, ्रदाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टर मधून प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी याच्या एन्काऊंटर मध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल. अमित शहांची तडीपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती! दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे बहुदा मा. पवार साहेब विसरले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!