सोलापूर : वृत्तसंस्था
वर्ष अखेर असतांना अनेक नागरिक पर्यटन व धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी जात असतात, या भेटी दरम्यान अनेक महामागार्वर अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घालून चौघा जणांना हिरावून घेतले. हे भाविक कर्नाटकातून चारचाकीने जात होते या भीषण अपघातात सहा जण जखमी झाले. यात आठ महिन्यांची मुलगी आश्चर्यकारकरीत्या बचावली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यातील पांडे गावाजवळ पहाटेच्या सुमारास भाविकांची तवेरा गाडी आणि कंटेनरची धडक हा अपघात घडला. श्रीशैल चांदेगा कुंभार (वय ५५), शशिकला श्रीशैल कुंभार (वय ५०), ज्योती दीपक हुनशामठ (३८ रा. कलबुर्गी) व शारदा हिरेमठ (वय ६७, रा. हुबळी) अशी मृतांची नावे आहेत. तर सौम्या श्रीधर कुंभार (वय २६), कावेरी विश्वनाथ कुंभार (वय २४), शशिकुमार त्रिशाला कुंभार (३६), श्रीदार श्रीशैल कुंभार (वय ३८), नक्षत्रा विश्वनाथ कुंभार (वय ८ महिने) आणि तवेरा चालक श्रीकांत रामकुमार चव्हाण (वय २६) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. अपघातानंतर तवेरा गाडी रस्त्याच्या खाली पालथी होऊन अक्षरशः चक्काचूर झाली. अपघातानंतर कंटेनर चालकाने पलायन केले.