ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कुपवाड्यात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न फसला; दोन दहशतवादी ठार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये शनिवारी भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केले, अशी माहिती चिनार कॉर्प्सने दिली आहे. नियंत्रण रेषेवरून (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी भारतीय लष्कराने मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली होती.

या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी लष्करी जवानांवर अंधाधुंद गोळीबार केला, मात्र जवानांनी प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईला ‘ऑपरेशन पिंपल’ असे नाव देण्यात आले असून, सुरक्षा दलांची मोहीम अद्याप सुरू आहे. याआधी ५ नोव्हेंबर रोजी किश्तवाड जिल्ह्यातील चतरू भागात झालेल्या चकमकीत एक सैनिक जखमी झाला होता. तसेच १३ ऑक्टोबर रोजीही कुपवाड्यातील कुंभकडी जंगलात दोन दहशतवादी ठार झाले होते. दरम्यान, जम्मूच्या आरएस पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी घुसखोराला अटक करून त्याच्याकडून पाक चलन जप्त करण्यात आले आहे. ही सततची कारवाई दाखवते की, भारतीय लष्कर सीमेवरील घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यात पूर्णपणे सज्ज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!