ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ठाकरेंचे कार्यकर्त्याना आवाहन : सत्ता उलथवून टाका !

मुंबई : वृत्तसंस्था

सत्तेला घाबरणार असाल तर काहीच उपयोग नाही. पण ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता बदलल्याशिवाय पर्याय नाही, ती उलथवून टाकलीच पाहिजे, अशा शब्दात शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शुक्रवारी आवाहन केले.

नवे वर्ष आणि त्याही पुढची वर्षे ही संपूर्ण देशाला आनंदाची, उत्साहाची आणि भरभराटीची व लोकशाहीची जावो, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या. पुढील वर्ष हे निवडणुकीचे असल्याने प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याच्या मागे लागला आहे. पक्षात येणाऱ्यांचे जोरदार स्वागत होत आहे. शुक्रवारी शिवसेनेत (ठाकरे) जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील शिवसेना (शिंदे) व भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. ‘मातोश्री’ निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या हातात शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत, पाचोऱ्यातील नेत्या वैशाली पाटील उपस्थित होत्या.

या प्रवेशानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले, ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता बदलल्याशिवाय पर्याय नाही. ती बदललीच पाहिजे. त्या जिद्दीनेच मी उभा आहे. सत्ता ही प्रत्येक सामान्य माणसाला आपली वाटली पाहिजे. पण त्या सत्तेची भीती वाटत असेल तर अशी सत्ता उलथवलीच पाहिजे आणि ती उलथवण्यासाठीच आपण काम करीत आहोत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!