पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अजित पवार गटाचे नुकतेच कर्जत येथे पक्षाचे शिबीर सुरु असतांना नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठी गोप्यस्फोट केला आहे.
देवेगौडा पंतप्रधान असताना काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष सीताराम केसरी यांच्याशी त्यांचे खटके उडू लागले. त्रासून त्यांनी पंतप्रधानपद सोडायचे ठरवले. तेव्हा केसरी यांच्याविरोधात निवडणूक लढवलेले शरद पवार यांना त्यांनी बोलावून घेतले. मी सारी ताकद तुमच्या मागे लावतो. तुम्ही पंतप्रधान व्हा, अशी गळ घातली. पण ऐनवेळी कच खाल्ल्याने शरद पवार तेव्हा पंतप्रधान होऊ शकले नाहीत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या शिबिरात केला.
कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढविल्याने केसरी आणि पवार यांचे संबंध मधुर राहिले नव्हते, पण १४० खासदार पवारांसोबत होते. देवेगौडा राजीनामा देणार होते त्यांचा पाठिंबा असूनही शरद पवार ऐनवेळी माघारी का फिरले, हे मला अजूनही कळाले नाही, असे ते म्हणाले. अजित पवार यांनाही ज्या गोष्टी ठाऊक नाहीत, त्या मला माहिती आहेत. त्यावर मी पुस्तक लिहिणार आहे, त्याची वाटा पाहा, असे पटेल कार्यकर्त्यांना म्हणाले.