ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अंतराळविरांना मिळावे सोलापूरची शेंगा चटणी आणि कडक भाकरी

सोलापूर : सोलापूरची प्रसिद्ध शेंगा चटणी आणि कडक भाकरी ज्याची चव जगभर प्रसिद्ध आहे, ज्यात अनेक पौष्टिक सत्व आहेत आणि बहुतांश आहारतज्ञांनी ह्या पौष्टिक खांद्याचे कौतुक केले, असे पौष्टिक आहार अंतरावरविरांना मिळण्यासाठी गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी भारताच्या अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो तथा अमेरिकेच्या नासा ह्या संस्थांना ह्या खाद्यपदार्थांवर संशोधन करण्याची विनंती केली आहे. सोलापूरच्या खाद्य संस्कृती मध्ये शेंगा चटणी आणि कडक भाकरी यांचा वापर हजारो वर्षांपासून होत असल्याचे अनेक संशोधनपर दाखले उपलब्ध आहेत.

सोलापूरची शेंगा चटणी आणि कडक भाकरी हे दिर्घकाळ टिकुन राहणारे खाद्य पदार्थ असून, त्यांच्या न्युट्रिशल व्हॅल्यूमुळे मनुष्य शरिराला लागणार्‍या दिवसभराच्या आवश्यक कॅलरी आणि इतर महत्त्वपूर्ण घटक ह्या खाद्यपदार्थां मध्ये पुरेश्या प्रमाणात उपलब्ध आहेत, असे गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी त्यांच्या विनंती पत्रात नमूद केले आहे. सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे विषय राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्थारापर्यंत गिरिकर्णिका फाऊंडेशनने उचलून त्यांची सोडवणूक केली असुन सोलापूरची शेंगा चटणी आणि कडक भाकरीला जी.आय.टॅग भौगोलिक मानांकन मिळुन देण्यासाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव प्रयत्नशील आहेत.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो तथा अमेरिकेच्या नासा ह्यांच्या संशोधन विभागाने सोलापूरच्या शेंगा चटणी आणि कडक भाकरी ह्या खाद्यपदार्थांवर व्यापक संशोधन करावे आणि येणाऱ्या अंतराळ मोहिमेत अंतराळविरांना सोलापूरची शेंगा चटणी आणि कडक भाकरी द्यावे अशी विनंती गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी दोन्ही संस्थांना केली आहे. सोलापूरची शेंगा चटणी आणि कडक भाकरी हे खाद्यपदार्थ सद्या संपूर्ण भारतासहीत विदेशात सहजरीत्या उपलब्ध आहेत, ह्या खाद्यपदार्थांच्या निर्मिती मुळे सोलापूरात अनेक बचत गट, स्वयंसेवी संस्था आणि महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाले असून ह्या संशोधनाचा सोलापूरच्या विकासात आणि नावलौकिकात भर पडण्यात निश्चित मदत होणार असल्याची सकारात्मक चर्चा सद्या समाज माध्यमातून व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!