पंडित भिमण्णा जाधव,सुरमणी गुरुनाथ जाधव यांच्या सुंदरी वादनाचे स्वर आता पश्चिम बंगाल मध्येही घुमणार !
सोलापूर,दि.२५ : कल्पदीप इंस्टीट्यूट व सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने कल्पदीप उत्सव 27 व 28 सप्टेंबर 2022 रोजी पश्चिम बंगाल जलपाईगुडी येथे कल्पदिप उत्सव कार्यक्रम अंतर्गत भारत देशातील विविध प्रातातील कलाकार गायन वादन नृत्य कार्यक्रम करिता समाविष्ट करण्यात आलेल्याची माहिती सुंदरीसाम्राट कै. सिद्राम जाधव सांस्कृतिक कला मंडळचे सचिव पंडित भिमण्णा जाधव यांनी दिली.
कल्पदीप इंस्टीट्यूट व सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने कल्पदीप उत्सव करिता सोलापुरातील प्रख्यात पंडित भिमण्णा जाधव सुरमणी गुरुनाथ जाधव यांना आमंत्रित केलेले आहे. 27 सप्टेबर 2022 पंडित भिमण्णा जाधव सुरमणी गुरुनाथ जाधव सामुहिक सुंदरी वादन तबला पंडित.अपूर्वा मुखर्जी तबला सह कलावंत म्हणून कला सादर करणार आहेत.
कोलकत्ताचे श्रीप्रणा चक्रवर्ती यांचे कत्थक नृत्य दिल्लीचे प्रितमदास यांचे भरनाट्यम, भुवनेश्वरचे गुरु रतिकांत महापात्रा व श्रीमती राजश्री प्रहराज यांचे ओडिसा नृत्य कल्पदिप इंस्टिट्यूट यांचे सामूहिक ओडिसी नृत्य, दि.28 सप्टेबर गायन वादन नृत्य विषयी सेमीनार, जलपाईगुड़ीचे शुभर्ता डे यांचे सतार वादन तबला साथ अपूर्वा कसा बैनर्जी परामिता मैत्र यांचे कत्थक नृत्य, डॉक्टर पोम्पी पॉल याचे कल्पदिप ओडिसा नृत्य सादर होणार आहे.
पंडित भिमण्णा जाधव, सुन्द्रीसम्राट सिद्राम जाधव यांचे नातु व पंडित चिदानंद जाधव यांचे चिरंजीव आजतागायत भारतातील प्रतिष्ठीत संगीत समारोहामध्ये सुन्द्री वादनाची सेवा करत सुन्द्री वाद्यास सातासमुद्रापलिकडे पोहचविण्यास भिमण्णा यांचा सिंहाचा वाटा आहे. बेल्जियम व फ्रांन्स येथे फिमु फेस्टिव्हल करीता भारताचे सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून निवड झाली होती. 26 जानेवारी 2013 प्रजासत्ताक दिनानिमित्त आकाशवाणी अखिल भारतीय कार्यक‘मातून सर्वच आकाशवाणी केंद्रातून एकाच वेळी भिमण्णा जाधव यांचे सुन्द्री वादन प्रसारित झाले होते. ऑल इंडिया रेडिओचे ए वर्ग श्रेणीचे कलावंत आहेत. आतापर्यंत त्यांना भारतातील प्रतिष्ठित पुरस्कार, फेलोशिप, स्कॉलरशिपने सन्मानित करण्यात आले आहे. दि. 21 ऑगस्ट 2013 रोजी दुर्लभ सुन्द्री वाद्य कला अकादेमी स्थापन करुन सुन्द्री वाद्याचा प्रचार व प्रसार करीता उद्योन्मुखी कलावंतास सुन्द्रीसम्राट बाल व युवा पुरस्कार सुरुवात केली व आजतागायत भारतातील 32 कलाकारांना सुन्द्रीसम्राट पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.